मिळेल तुफान रिटर्न, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना इकडे द्या लक्ष

Mutual Fund Bumper Returns : चांगला परतावा आणि कमी जोखीम अशी गुंतवणूक कुणाला नकोय, नाही का? गुंतवणूक करताना अनेक जणांना चांगला परतावा आणि कमी जोखीम हवी असते, त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय ठरु शकतो.

मिळेल तुफान रिटर्न, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना इकडे द्या लक्ष
कसा मिळेल बंपर रिटर्न
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 5:28 PM

प्रत्येकजण भविष्य सुखसमाधानाचं, आनंदाचं असावं यासाठी झटत असतो. योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची आपण योजना आखतो. कमी जोखीम आणि जादा परताव्यासाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय म्हणून समोर आले आहेत. पण तुम्ही एकदम डोळे झाकून गुंतवणूक केली तर मात्र त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो. म्यु्च्युअल फंडच्या गुंतवणुकीतही सजग राहणे आवश्यक आहे. तरच बंपर रिटर्न मिळतो. तुमच्या गुंतवणुकीचा आढावा घेतला नाही तर परताव्यात गडबड होऊ शकते.

वेगवेगळ्या योजनेत करा गुंतवणूक

  • म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा पहिला मंत्र हाच आहे की, एकाच फंडात पूर्ण गुंतवणूक करु नका. जेव्हा तुम्ही फंडला शॉर्टलिस्ट करता. तेव्हा वेगवेगळे फंड निवडा. जर तुम्ही गुंतवणूक करत आहात तर सुरुवातीला दोन फंडात करा. कारण एकाच फंडात गुंतवणूक केल्यास तुमची जोखीम अधिक वाढते. जर तुम्हाला प्रत्येक महिन्यात दोन हजार रुपये गुंतवायचे असतील तर लार्ज कॅप, मिड कॅप फंड्सची निवड करा.
  • श्रेणी एक असली तरी स्कीम्सचे व्यवस्थापन वेगवेगळे ठेवा. काही लार्ज कॅप फंड्स केवळ मोठ्या कंपन्यातच गुंतवणूक करतात. तर काही मध्यम कंपन्यात पण गुंतवणूक करतात. पोर्टफोलिओत सर्व श्रेणींमधील 6-8 स्कीम्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येतो.

गुंतवणुकीसाठी निवडा विभिन्न श्रेणी

हे सुद्धा वाचा

जेव्हा तुम्ही विविध श्रेणीत गुंतवणूक करता. तेव्हा तुमची जोखीम कमी होते. जसे की तुम्ही तीन स्कीममध्ये, योजनांत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर लार्ज कॅप योजनेची निवड करा. त्यानंतर मल्टी वा मिडकॅप फंडची निवड करा. तुम्ही डेट फंड पण निवडू शकता. जर इक्विटी बाजार गडगडला तरी मिड कॅप फंड्समध्ये अधिक घसरण दिसेल. तर बाजार तेजीत असेल तेव्हा मिड कॅप आणि लार्ज कॅप फंड्समध्ये तेजीचे सत्र येईल.

या गोष्टी ठेवा लक्षात

सर्व फंड हाऊस वेगवेगळ्या दृष्टीने गुंतवणुकीची योजना आखतात. जेव्हा विविध योजनांमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही एकच फंड हाऊस तर निवडला नाही ना? तुम्ही जसे वेगवेगळ्या योजनांची निवड करता, तसे फंड हाऊस पण वेगवेगळे निवडा. तुमचा पैसा वेगवेगळ्या Asset Management कंपन्यांमध्ये लावा. स्मॉल आणि मिड साईज फंडवर पण लक्ष ठेवा.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.