IPL Retention 2025: आयपीएल टीमचा ‘मेड इन इंडिया’चा मंत्र, 20 कोटींवर प्रथमच तीन भारतीय, वाचा A to Z माहिती

IPL 2025 Auction Team: यंदाच्या आयपीएल लिलावात गुजरात आणि मुंबई दोन संघ मजबूत झालेले दिसत आहे. गुजरातने गोलंदाजी आक्रमक करण्यावर भर दिला. त्यासाठी त्यांनी कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, राशिद खान यांना घेतले. कर्णधार म्हणून शुभमन गिल आहे.

IPL Retention 2025: आयपीएल टीमचा मेड इन इंडियाचा मंत्र, 20 कोटींवर प्रथमच तीन भारतीय, वाचा A to Z माहिती
IPL
| Updated on: Nov 26, 2024 | 6:08 PM

IPL 2025 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) अठराव्या हंगामासाठी दोन दिवसीय मेगा ऑक्शन पार पडले. यंदाच्या या लिलावात अनेक नवीन विक्रम झाले आहेत. या लिलावात इतिहास रचला गेला. २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियामध्ये झालेल्या लिलावात १० संघांनी ६३९.१५ कोटी रुपये खर्च करुन एकूण १८२ खेळाडूंना घेतले. दहा बड्या खेळाडूंना कुणीच घेतले नाही. परंतु १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी याने सर्वांचे लक्ष वेधले. त्याला १.१० कोटींमध्ये राजस्थान संघाने घेतले. आयपीएलमध्ये खेळणारा वैभव हा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या संघाने घेतले. पहिल्या दिवशी तो विकला गेला नव्हता. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त बोलीसुद्धा यंदाच लावण्यात आली. ऋषभ पंत सर्वात महाग खेळाडू ठरला. त्याला २७ कोटी रुपयांत लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने घेतले. ६ फूट ३ इंच उंच खेळाडूही यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार आहे. गुरजपनीत सिंह याला चेन्नई सुपर किंग्सने २.२० कोटींत घेतले. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा