
देशभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खास आहे. आयपीएल 2025 चा अंतिम सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे संघ एकमेकांशी भिडणार आहे. विशेष म्हणजे यंदा नवा विजेता मिळणार आहे, कारण या दोन्ही संघांनी अद्याप एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी खास असणार आहे. या महत्वाच्या सामन्यात दोन्ही संघांच्या प्लेइंग ११ मध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश असू शकतो ते जाणून घेऊयात.
आरसीबीच्या प्लेइंग ११ मध्ये या खेळाडूंना संधी मिळणार
आरसीबीकडूम आजच्या महत्वाच्या सामन्यात विराट कोहली आणि फिल सॉल्ट हे खेळाडू सलामीला उतरणार आहे. या दोघांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेली आहे, त्यामुळे आजही त्यांच्याकडून चांगल्या सलामीची अपेक्षा असणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर मयंक अग्रवाल आणि चौथ्या क्रमांकावर रजत पाटीदार उतरण्याची शक्यता आहे.
आरसीबीकडून पाचव्या क्रमांकावर जितेश शर्मा, सहाव्या क्रमांकावर टिम डेव्हिड, सातव्या क्रमांकावर रोमारिओ शेफर्ड यांना संधी मिळू शकते. त्यानंतर गोलंदाजीत कृणाल पांड्या, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड यांना संधी मिळू शकते.
‘हे’ खेळाडू पंजाबला चॅम्पियन बनवणार
पंजाबकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या यांना संधी मिळेल, तर तिसऱ्या क्रमांकावर जोश इंग्लिस, चौथ्या क्रमांकावर कर्णधार श्रेयस अय्यर, पाचव्या क्रमांकावर नेहल वढेरा, सहाव्या क्रमांकावर शशांक सिंग यांना संधी मिळू शकते. या सर्व खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेली आहे.
गोलंदाजीत अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरजाई, युजवेंद्र चहल, काईल जेमीसन, विजयकुमार वेशाख यांनी सधी मिळू शकते. या सर्व गोलंदाजांवर आरसीबीच्या आक्रमक फंलंदाजांना रोखण्याचे आवाहन असणार आहे.
आरसीबीची संभाव्य प्लेइंग ११
विराट कोहली, फिल सॉल्ट, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन/टिम डेव्हिड, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड.
पंजाबची संभाव्य प्लेइंग ११
प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, अजमतुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, वैशाक विजयकुमार.