
IPL 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा कप्तान श्रेयस अय्यर याने केवळ आपली फलंदाजीत नव्हे कर आपली समजदारीपूर्ण कॅप्टनशीपने सर्वांना प्रभावित केले आहे. जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुच्या टीमची मयंक अग्रवाल आणि विराट कोहली यांच्या मजबूत भागीदारीने वेगाने रन कुठत होती तेव्हाच अय्यर याने एक आश्चर्यचकीत डाव खेळला. रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुने पंजाबसमोर आयपीएल -2025 ट्रॉफी जिंकण्यासाठी 191 धावांचं आव्हान दिलं आहे. आता पंजाब हे आव्हान पूर्ण करतो याकडे क्रिकेट रसिकांच्या नजरा लागल्या आहेत.
अहमदाबाद मध्ये आयपीएल – २०२५ ची अंतिम मॅच सुरु असताना श्रेयस अय्यर याने केवळ आपली फलंदाजीच नव्हे तर आपली जोरावर कप्तानी देखील दाखवली आणि सर्वांनाच चकीत केले. जेव्हा रॉयल चॅलेजर्स बंगळुरूची (RCB) टीम मयंक अग्रवाल आणि विराट कोहली याच्या जोरदार भागीदारीच्या बळावर आपल्या समजदारीने सर्वांनाच प्रभावित केले. जेव्हा अय्यर याने एक आश्चर्यचकीत करणारा निर्णय घेतला.
श्रेयस अय्यर याने मयंक अग्रवालची कमजोरीला वेळी ओळखले आणि पॉवरप्ले संपताच त्याने युजवेंद्र चहल याच्या हातात बॉल सोपवला. ही श्रेयस अय्यर याची खेळी एकदम परफेक्ट झाली आणि मॅचचा रंगच बदलला..
युजवेंद्र चहल याने गोलीदांजीला सुरुवात करताच त्याने पुन्हा एकदा त्याचा नेहमीचा शिकार ठरलेल्या मयंकला गुंडाळले. मयंक अग्रवाल याने एक स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतू बॉल थेट स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या अर्शदीप सिंग याच्या हातात अलगद गेला. त्यावेळी मयंक अग्रवाल हा २४ धावांवर खेळत होता आणि चांगल्या लयीत आला होता, पण त्याच्या एका चुकीच्या शॉटमुळे त्याचा खेळ संपला.
मयंक अग्रवाल आणि युजवेंद्र चहल यांच्यातलं हे वैर जुन आहे. आकडेवारी पाहाता आतापर्यंत मयंक याने टी-२० स्पर्धांमध्ये ८ वेळा चहलची विकेट घेतली आहे. युजवेंद्र चहल याने टी-२० मध्ये आतापर्यंत अन्य कोणत्याही फलंदाजापेक्षा मयंक याला सर्वाधिक वेळा बाद केले आहे.