IPL FINAL 2025: विराट कोहलीची RCB हरली तर या रॅपरला इतक्या कोटींचा फटका,काय कारण ?
रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु आणि पंजाब किंग्स या संघा दरम्यान आयपीएल 2025 ची फायनल अहमदाबादेत सुरु आहे.या अंतिम मॅचवर प्रसिद्ध कॅनेडियन रॅपर ड्रेक याने कोट्यवधी रुपये लावलेत जर आजची ट्रॉफी विराट कोहली याची टीम आरसीबी जिंकली तर ड्रेकवर छप्परफाडके पैशांची बरसात होणार आहे.

IPL FINAL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु आणि पंजाब किंग्स दरम्यान आयपीएल – 2025 ची मॅच सुरु झाली आहे. या फायनल मॅचची प्रतिक्षा क्रिकेट फॅन्स चातकासारखी वाट पाहात आहे. तर कॅनडाचा प्रसिद्ध रॅपर ड्रेक यांच्या नजरा या अंतिम मॅचवर खिळल्या होत्या. कारण त्याने या अंतिम मॅचवर कोट्यवधी रुपये लावले आहेत. त्याने कोणत्या टीमवर पैसा लावला आहे ते पाहूयात..जर टीम जिंकली तर ड्रेक याला किती कोटींचा फायदा होणार ते पाहूयात..
RCB वर लावले 6.41 कोटी रुपयांची बोली
जगभरात प्रसिद्ध असलेला आणि ग्रॅमी अवॉर्ड विनर ड्रेक याने विराट कोहली याची टीम आरसीबीवर डाव लावला आहे. त्याच्या मते ही फायनल मॅच आरसीबी जिंकणार आहे. ड्रेक याने काही तास आधीच आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केलेय त्याने आरसीबीवर क्रिप्टो बेस्ड सट्टा प्लॅटफॉर्म Stake वर पैसा लावला आहे. रॅपरने $750,000 (6.41 कोटी रुपये) ची रक्कम लावली आहे.
आरसीबी जिंकली तर 11 कोटींहून अधिक पैस मिळणार
जर आरसीबी संघ आजचा अंतिम सामना जिंकला तर ड्रेक यालाही भरपूर पैसे मिळतील. 6.41 कोटी रुपयांच्या सट्ट्याच्या बदल्यात आरसीबीच्या विजयानंतर त्याला 1.3 दशलक्ष डॉलर्स (11.11 कोटी रुपये ) मिळतील. आणि समजा फायनल ट्रॉफी पंजाब किंग्जच्या हाती लागली तर ड्रेकचे मोठे नुकसान होणार आहे. ड्रेकने हा स्क्रीनशॉट शेअर केलाच शिवाय ड्रेकने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आरसीबीचे प्रसिद्ध स्लोगन ‘ई साला कप नामदे’ देखील लिहिले आहे. याचा अर्थ ‘या वर्षीचा कप आमचा आहे’.
अंतिम सामना अहमदाबादमध्ये सुरु
आयपीएलचा 18 व्या सिझनचा अंतिम क्रिकेट सामना मंगळवारी, 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम रंगला आहे. रजत परिदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज यांच्यात अंतिम सामना रंगला आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीने पंजाबला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाबने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आयपीएलच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही संघ ही ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कारण 18 वर्षांच्या इतिहासात, आरसीबी आणि पंजाब दोघांनीही या अंतिम ट्रॉफीसाठी सारखेच दावेदार मानले जात आहे.
