IPL 2025 मध्ये राहुल द्रविडच्या टीमवर मॅच फिक्सिंगचा मोठा आरोप, कुठल्या टीम विरुद्ध होता सामना?
IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये राहुल द्रविड हे राजस्थान रॉयल्स टीमचे हेड कोच आहेत. त्यांच्या टीमवर जाणूनबुजून हरल्याचा मोठा आरोप झाला आहे. महत्त्वाच म्हणजे राजस्थानमधूनच हा आरोप झाला आहे. कुठल्या टीम विरुद्ध होता हा सामना?.

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 2 धावांनी पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सवर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. राजस्थान रॉयल्सवर मॅच फिक्सिंगचे आरोप होताना दिसतायत. राजस्थान क्रिकेट असोशिएशनच्या एड हॉक कमिटीचे संयोजक जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्स टीमवर हे आरोप लावले आहेत. श्रीगंगानगर येथून MLA जयदीप बिहानी यांनी RR वर मॅच फिक्सिंगचा आरोप केलाय. LSG विरुद्ध लास्ट ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा जो अप्रोच होता, त्यावर प्रश्न उपस्थित केलाय. तेच पराभवाच कारण आहे.
जयदीप बिहानी यांनी सरकारच्या एड हॉक कमिटीची स्थापना करण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं. IPL शी संबंधित राजस्थान रॉयल्सच्या हितावर कंट्रोलच नसेल, तर काय फायदा? असा प्रश्न जयदीप बिहानी यांनी विचारला. राजस्थानात राज्य सरकारने एड हॉक कमिटीची स्थापना केली आहे. या कमिटीचा कार्यकाळ वाढवण्याची ही पाचवी वेळ आहे. सर्व स्पर्धांच व्यवस्थित आयोजन करणं हा या कमिटीच्या स्थापनेमागचा उद्देश आहे.
हेटमायर नॉन स्ट्रायकर एन्डला होता
जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स सामन्यातील शेवटच्या ओव्हरवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. लास्ट ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 9 धावांची आवश्यकता होती. ध्रुव जुरेल स्ट्राइकवर होता. शिमरोन हेटमायर नॉन स्ट्रायकर एन्डला होता. आवेश खान गोलंदाजीला होता. त्याने ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या. अशा प्रकारे लखनऊ सुपर जायंट्सने हा सामना 2 धावांनी जिंकला.
राजस्थान टीमने चालू सीजनमध्ये किती सामने जिंकलेत?
जयदीप बिहानी मागच्या काही काळापासून राजस्थान रॉयल्सशी संबंधित विषयांमध्ये आवाज उठवत आहेत. राजस्थान रॉयल्सने चालू सीजनमध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यात 2 मॅचमध्ये विजय मिळवलाय. 6 सामन्यात पराभव झालाय. पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम 8 व्या नंबरवर आहे.