कोरोनाविरुद्धच्या लढाईत सनरायझर्स हैदराबाद मैदानात, आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर

| Updated on: May 10, 2021 | 3:08 PM

आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद या संघाने आयपीएल फ्रँचायजींपैकी आतापर्यंतची सर्वांत मोठी मदत जाहीर केली आहे. सनरायजर्स हैदराबादने 30 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. (IPL Sunrisers hydrabad donate 30 Crore against Covid 19)

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सनरायझर्स हैदराबाद मैदानात, आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर
सनरायजर्स हैदराबादने 30 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.
Follow us on

मुंबई :  भारतात कोरोनाची भीषण परिस्थिती निर्माण झालीय. दररोज तीन ते 4 लाख लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणा देखील कमजोर पडू लागली आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत मदतीचे हात पुढे येतायत. आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) या संघाने आयपीएल फ्रँचायजींपैकी आतापर्यंतची सर्वांत मोठी मदत जाहीर केली आहे. सनरायजर्स हैदराबादने 30 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. (IPL Sunrisers hydrabad donate 30 Crore against Covid 19)

सनरायझर्स हैदराबादच्या मालकीची सन टीव्हीने सोमवारी राज्य आणि केंद्र सरकार व्यतिरिक्त विविध स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या कोविड 19 मदत कार्यांसाठी 30 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

मदतीची घोषणा करताना हैदराबादने काय म्हटलंय…?

देशात पाठीमागच्या 24 तासांत 4 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर 4092 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सनरायजर्स हैदराबादने आपल्या ट्विटरवरुन मदतीची घोषणा केली आहे. घोषणा करताना “कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेने बाधित लोकांना दिलासा देण्यासाठी सन टीव्ही 30 कोटी रुपयांची देणगी देत ​​आहे”, असं सनरायजर्स हैदराबादने म्हटलं आहे.

देशातील कोरोना स्थिती कशी?

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत काहीशी घट (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 3 लाख 66 हजार 161 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 754 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात बरे झालेल्या कोरोनाग्रस्तांचा आकडाही साडेतीन लाखांपेक्षा जास्त आहे.

गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. मात्र गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 66 हजार 161 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 754 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 53 हजार 818 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

(IPL Sunrisers hydrabad donate 30 Crore against Covid 19)

हे ही वाचा :

विराट कोहलीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, लस घेताच लोकांसाठी खास मेसेज

2011 च्या वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूच्या वडिलांचं कोरोनाने निधन

पॅट कमिन्सकडून छोटीशी चूक, मयंतीऐवजी मयंकला टॅग करुन सांगितली ‘ही’ गोष्ट, पुढे काय झालं?