
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगरने हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आला त्यानंतर. या हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशनमुळे आर्यन पूर्णपणे आता मुलगी झाला आहे. त्यावेळी तिने नाव बदलून अनन्या बांगर असं ठेवलं. तेव्हापासून ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अनन्या बांगरने एक मोठी घोषणा केली आहे. तिने तिच्या खऱ्या रूपात परतण्याची घोषणा केली आहे.
अनाया बांगरचा यू-टर्न घेण्याचा निर्णय
अलिकडेच, अनाया बांगर मुलापासून मुलगी झाल्यानंतर इंग्लंडहून भारतात परतली. मुलापासून मुलगी झाल्यानंतर ती बरीच चर्चेत आली. पण आता तिने जाहीर केले आहे की ती तिच्या खऱ्या रूपात परतणार आहे. प्रश्न असा आहे की, अनाया बांगरने यू-टर्न घेण्याचा निर्णय खरंच घेतला आहे का? ती पुन्हा मुलगा होणार आहे का? ती त्याच्या खऱ्या स्वरूपात म्हणजे खरंच मुलाच्या रुपात परत येईल असा त्याचा बोलण्याचा अर्थ आहे का? अनाया बांगर तिच्या मूळ रूपात परत येईल का? असे अनेकप्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अनाया बांगरचा व्हिडिओ व्हायरल
अनाया बांगरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने तिच्या इंस्टा स्टोरीवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये ती तिची मैत्रिण सनत चड्ढासोबत म्हणत आहे की ती तिच्या खऱ्या रूपात आता परत येत आहे. आता याचा अर्थ काय ते तिने नेमकं सांगितलं नाही. पण असं नक्कीच वाटतंय की अनया पुन्हा मुलगी ते मुलगा होण्याचा विचार करत नाहीये. अशा परिस्थितीत, असे म्हणण्यामागील तिचा उद्देश शूटशी संबंधित काहीतरी असू शकतो असा अंदाज लावला जात आहे.
अनाया शूटिंगसाठी दिल्लीला
अनाया बांगरने हा व्हिडिओ शेअर केला तेव्हा ती दिल्ली-एनसीआरमध्ये होती. व्हिडिओमध्ये दिसणारी तिची मैत्रिण सनत व्यवसायाने फॅशन जगताशी संबंधित आहे. असे मानले जाते की अनाया काही शूटिंगसाठी दिल्लीत आहे. अलिकडेच, तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये, तिने शूटसाठी फोटोग्राफरची गरज असल्याचे देखील सांगितले होतं.
आर्यनची अनाया कशी झाली?
अनाया बांगर ही माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी आहे. त्याची ओळख आधी आर्यन बांगर म्हणून झाली होती, जो व्यवसायाने क्रिकेटपटू होता. तो डावखुरा फलंदाज आणि फिरकी गोलंदाज होता. आर्यनने यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खान सारख्या क्रिकेटपटूंसोबत अंडर एज क्रिकेट स्पर्धांमध्येही खेळले आहे. तथापि, आर्यन वरून अनाया असे नाव बदलल्यानंतरही त्याचे क्रिकेटवरील प्रेम कमी झालेले नाही. अलिकडेच अनन्या फलंदाजीचा सराव करताना दिसली. त्यामुळे आता तिच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे अर्थ आता नेटकरी लावत आहेत.