Sania Mirza : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात खरंच घटस्फोट झाला आहे का ? “टॉक शो”च्या घोषणेमुळे दोघं पुन्हा चर्चेत

मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु होती.

Sania Mirza : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात खरंच घटस्फोट झाला आहे का ? टॉक शोच्या घोषणेमुळे दोघं पुन्हा चर्चेत
sania mirza and shoaib malik
Image Credit source: Google
| Updated on: Nov 14, 2022 | 12:42 PM

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्यात घटस्फोट झाल्याची चर्चा सुरु आहे. मात्र दोघांनी अद्याप या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. पाकिस्तानमधील (Pakistan)काही वाहिन्यांनी दोघं अनेक महिन्यांपासून वेगळं राहत असल्याचं वृत्त दिलं होतं. सोशल मीडियावर सुद्धा दोघांच्या चाहत्यांकडून जोरदार चर्चा सुरु होती. सानिया मिर्झाने तिच्या इंन्स्टाग्रामवरती एक स्टोरी ठेवली होती, त्यामध्ये सद्याचा काळ माझ्यासाठी एकदम अवघड असल्याचं म्हटलं होतं.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक एक टॉक शो होस्ट करणार आहेत, अशी पोस्ट सोशल मीडियावर दोघांनी शेअर केली आहे. त्या शोचं नाव ‘द मिर्झा मलिक शो’असं आहे. हा शो चाहत्यांना पाकिस्तानी चॅनल उर्दूफ्लिक्स ऑफिशियलवर पाहता येणार आहे. दोघांनी शेअर केलेल्या पोस्टर खाली अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक चाहत्यांनी दोघांच्या विभक्त होण्याबाबत प्रश्न विचारले आहेत. पोस्टला “मिर्झा मलिक शो लवकरच फक्त उर्दूफ्लिक्सवर येत आहे.” असं लिहिलं आहे.

दोघांनी एक शो करीत असल्याचे पोस्टर शेअर केल्यापासून घटस्फोट झाल्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु होती.

2010 मध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी लग्न केलं होतं. त्यानंतर दोघंही राहायला दुबईमध्ये होते. 2018 मध्ये दोघांना मुलगा झाला, त्याचं नाव इज़हान ठेवण्यात आलं होतं.

एक आठवड्यापुर्वी पाकिस्तान मीडियाने दावा केला होता की, दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनातील कठीण टप्प्यातून जात आहेत. विशेष म्हणजे सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या दोघांनी गोष्टी भाष्य केलं नव्हतं.