Ishan Kishan Video: तुम्हाला अक्कलच नाहीये…मध्यरात्री इशान किशनचा एअरपोर्टवर राडा, Video Viral
Ishan Kishan: इशान किशन मध्यरात्री दिल्ली एअरपोर्टवर संतापला. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण आता तो का संतापला याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

जपानमधील आयची-नागोया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारतीय क्रिकेट संघ मायदेशी परतला आहे. काल मध्यरात्री, भारतीय खेळाडू दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यानंतर घरी जात असताना इशान किशनने मध्यरात्री एअरपोर्टवरच राडा केला ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
जेव्हा टीम इंडिया मध्यरात्री जपानहून दिल्ली विमानतळावर पोहोचली. तेव्हा सगळे खेळाडू एकामागोमाग एक चालत होते, इशान तेव्हा फोनवर बोलण्यात व्यस्त होता. कॅमेरा घेऊन आलेल्या पॅपराझी इशान इधर, इशान इधर असं म्हणत त्याला त्रास दिला. इशानचा संयम सुटला आणि तो म्हणाला, “तुमच्या लोकांना वाईट सवयी आहेत. तुम्हाला अक्कलच नाहीये. तुमच्यात अजिबात समज नाही.” आता याचाच व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
𝗜𝘀𝗵𝗮𝗻 𝗞𝗶𝘀𝗵𝗮𝗻 𝗚𝗼𝘁 𝗔𝗻𝗴𝗿𝘆 𝗮𝘁 𝘁𝗵𝗲 𝗠𝗲𝗱𝗶𝗮 😅😭
He said, “You guys have a bad habit. You don’t have any sense at all.” 😥
After midnight (1 AM), when Team India landed at Delhi Airport from Japan, the person responsible for guiding the guests to their destination shared their exact location with the media.
The media then arrived while Ishan was busy on a phone call, but they kept disturbing him. That’s when he lost his patience and said:
“Aap logon ki aadat kharab hai. Dimaag hi nahi hai kuchh.” 😂
— Mukku (@Cric_Mukku) October 5, 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला १९ धावांनी हरवून सुवर्णपदक जिंकले. उपांत्य सामन्यात शानदार अर्धशतक झळकावणारा इशान किशन अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही. उपांत्य फेरीत श्रीलंकेविरुद्ध ८० धावांची नाबाद खेळी खेळल्यानंतर, तो १८ चेंडूंमध्ये २० धावांवर बाद झाला.
सुवर्णपदकाच्या सामन्यात, अभिषेक शर्मा (२८ चेंडूंमध्ये ६१ धावा) आणि तिलक वर्मा (२२ चेंडूंमध्ये ५१ धावा) यांच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर भारताने सहा गडी गमावून २११ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, हसन नवाझच्या आक्रमक खेळीनंतरही, पाकिस्तानला हा रोमांचक अंतिम सामना १९ धावांनी गमवावा लागला. खराब सुरुवात करूनही, हसन नवाझच्या ५१ चेंडूंमधील ९६ धावांच्या जोरावर पाकिस्तान सामन्यात टिकून होता, परंतु शेवटच्या षटकात आवश्यक ३३ धावा करू शकला नाही.
इशान हा एकमेव नाही जो पॅपराझींवर भडकलाय. याआधीही खूप क्रिकेटर पॅपराझींच्या वर्तणुकीवर भडकले आहेत. पॅपराझींच्या गैरवर्तणुकीवरुन नुकतेच अनेक सेलिब्रिटींना आवाजही उठवला आहे. अनेकदा चुकीच्या पद्धतीने शूट केल्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी वेळोवेळी पॅपराझींना फटकारले आहे. बिगबॉसमध्येही सलमान खानने नुकतेच पॅपराझी यांना या मुद्द्यावर सुनावले होते.