IND vs AUS | चौथ्या कसोटीत ईशान किशन कि केएस भारत ? मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला…

| Updated on: Mar 08, 2023 | 1:19 PM

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ईशान किशनला अहमदाबादमध्ये कोचिंग करताना दिसले. त्यामुळे चौथ्या कसोटीत केएस भारत ऐवजी ईशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे.

IND vs AUS | चौथ्या कसोटीत ईशान किशन कि केएस भारत ? मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला...
IND vs AUS | चौथ्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये ईशान किशनला संधी ? काय सांगितलं राहुल द्रविडने वाचा
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 9 मार्चपासून सुरु होत आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या दृष्टीकोनातून भारतासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण या सामन्याच्या निकालावरच अंतिम फेरीचं गणित सुटणार आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये कोण असणार? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण फिरकीपटूंना पुरक असलेल्या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणं कठीण आहे. त्यामुळे चांगली फलंदाजी करेल अशा खेळाडूंना संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजार व्यतिरिक्त कोणताही खेळाडू चांगली खेळी करू शकलेला नाही.

रोहित शर्माने नागपूर कसोटीत 212 चेंडूत 120 धावांची खेळी केली होती. तर चेतेश्वर पुजाराने इंदुर कसोटीत 59 धावा केल्या होत्या. त्यामुळे फलंदाजांचा खेळताना कस लागणार आहे. त्यामुळे तीन कसोटीत फेल ठरलेल्या केएस भारतच्या जागी ईशान किशनला संघात संधी मिळणार का? याकडे लक्ष लागून आहे. केएस भारतने फलंदाजीतून साजेशी कामगिरी केलेली नाही. प्रशिक्षक राहुल द्रविडने याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

“या खेळपट्ट्यांवर फलंदाजीसोबत नशिबाची साथ मिळणं देखील गरजेचं आहे. केएस भारतला ती साथ मिळाली नाही. पण केएस राहुल पूर्णपणे फेल आहे असं आपण म्हणू शकत नाही. दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत त्याने चांगली फलंदाजी केली होती. काही चांगले शॉट्सही मारले होते. तो चांगला विकेटकीपर आहे. त्यामुळे फलंदाजी पाहताना इतर गोष्टी पण पाहणं गरजेचं आहे.”, असं राहुल द्रविडने सांगितलं.

द्रविडच्या मते, केएस भारत अहमदाबाद कसोटीत कीपिंग करू शकतो. असं असलं तरी ईशान किशनने जोरदार सराव केला. राहुल द्रविड ईशान किशनला कोचिंग देत होता. तर केएस भारत आराम करत होता. त्यामुळे चौथ्या कसोटीत ईशान किशनला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केएस भारतने कसोटीच्या पाच डावात 14.25 च्या सरासरीने 57 धावा केल्या आहेत. त्यापेक्षा जास्त धावा आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी केल्या आहेत. दुसरीकडे, केएस भारत हा ऋषभ पंतचा बॅकअप म्हणून संघात असेल, असंही बोललं जात आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन.

टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट