ENG vs IND : टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूवर नशीब मेहरबान, नीतीश रेड्डीच्या दुखापतीमुळे मिळणार आणखी एक संधी

ENG vs IND : इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाच्या एका खेळाडूला दुखापत झाली आहे. अशावेळी टीमच्या प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल दिसू शकतो. एका खेळाडूला संधी मिळणं जवळपास निश्चित आहे. टीम इंडिया या सीरीजमध्ये 2-1 ने पिछाडीवर आहे.

ENG vs IND : टीम इंडियाच्या या खेळाडूवर नशीब मेहरबान, नीतीश रेड्डीच्या दुखापतीमुळे मिळणार आणखी एक संधी
Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 21, 2025 | 9:37 AM

इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पिछाडीवर आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, मँन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात 23 जुलै 2025 पासून चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. पण त्याआधी ऑलराऊंडर नीतीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे सीरिजच्या उर्वरित दोन सामन्यात खेळू शकणार नाहीय. ही बातमी भारतीय टीमसाठी एक धक्का आहे. कारण नितीश कुमार रेड्डी मागच्या दोन सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. या संकट काळात एका अनुभवी फलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान पक्क करण्याची संधी दिली आहे.

नीतीश रेड्डीच्या दुखापतीने भारतीय टीमच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्याचवेळी अनुभवी फलंदाज करुण नायरसाठी ही एक मोठी संधी आहे. या सीरीजमध्ये आतापर्यंत करुण नायरच प्रदर्शन निराशाजनक राहिलं आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यात त्याने खराब प्रदर्शन केलय. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमधील त्याचं स्थान संकटात सापडलं होतं. रेड्डीच्या अनुपस्थितीत भारताच्या बॅटिंग कॉम्बिनेशनवर परिणाम होणार आहे. त्यामुळे करुण नायरला चौथ्या कसोटीत संधी मिळणं जवळपास निश्चित मानल जात आहे.

स्वत:ला सिद्ध करण्याची पुन्हा एकदा संधी

नीतीश रेड्डीचा बॅटिंग लाइनअप वाढवण्यासाठी टीममध्ये समावेश करण्यात आला होता. करुण नायरला तिसऱ्या स्थानावर खेळण्याची संधी मिळत आहे. आता टीम स्क्वॉडमध्ये फक्त साई सुदर्शन आणि अभिमन्यू ईश्वरन फलंदाज म्हणून उरले आहेत. अभिमन्यु ईश्वरन एक ओपनर आहे तेच साई सुदर्शन टॉप ऑर्डरमध्ये खेळतो. त्यामुळे करुण नायरच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल होऊ शकतो. पण तो प्लेइंग 11 च्या बाहेर जाणं जवळपास अशक्य आहे. अशा स्थितीत करुण नायरकडे मँचेस्टरमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची पुन्हा एकदा संधी आहे.

सीरीजमध्ये आतापर्यंत त्याने किती धावा केल्यात

करुण नायरला चालू सीरीजमध्ये आतापर्यंत तीन कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने 6 इनिंगमध्ये 21.83 च्या खराब सरासरीने फक्त 131 धावा केल्या आहेत. यात 40 त्याचा बेस्ट स्कोर आहे. करुण नायरने पहिल्या कसोटी सामन्यात फक्त 20 धावा केल्या होत्या. एका इनिंगमध्ये तो खातही उघडू शकला नव्हता. दुसऱ्या मॅचमध्ये 31 आणि 26 धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये 40 आणि दुसऱ्याडावात 14 धावा केल्या.