Dream 11 वर फेव्हरेट टीम कशी निवडतात, पैसे कसे कमवायचे? जाणून घ्या एका क्लिकवर

| Updated on: Dec 17, 2020 | 11:13 AM

ड्रीम इलेव्हन एक मोबाईल अॅप आहे. या अॅपची सुरुवात 2016 मध्ये झाली.

Dream 11 वर फेव्हरेट टीम कशी निवडतात, पैसे कसे कमवायचे? जाणून घ्या एका क्लिकवर
Follow us on

अॅडिलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यात आजपासून (17 डिसेंबर) कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. हल्ली कोणत्याही सामन्याआधी मोठ्या प्रमाणात ड्रीन इलेव्हन (Dream 11) या अॅपची चर्चा असते. सामना सुरु होण्याआधी या अॅपद्वारे आपली आवडती टीम निवडण्यात येते. याद्वारे अनेक जणं पॉइंट्स जमवतात आणि पैसे मिळवतात. पण अनेकांना याबाबत काहीच माहिती नसते. तर काहींना याबाबत उत्सुकता असते. मात्र या अॅपद्वारे कशा प्रकारे पैसे मिळवायचे याची माहिती नसते. या अॅपचा वापर कसा करतात, टीम कशी निवडतात, पॉइंट्स कमावून पैसै कसे जिंकता येतात, हे आपण जाणून घेणार आहोत. Learn how to choose your favorite team on Dream 11 and how to win money

ड्रीम इलेव्हन काय आहे?

ड्रीम इलेव्हन एक मोबाईल अॅप आहे. या अॅपची सुरुवात 2016 मध्ये झाली. या अॅपद्वारे कोणत्याही सामन्यााधी आपली आवडती प्लेइंग इलेव्हन निवडायची असते. जितके जण या अॅपद्वारे टीम निवडतात, त्यांच्या पॉइंट्सच्या रॅंकिंगच्या आधारावर त्यांना पैसे मिळतात. या अॅपद्वारे क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांमध्येही बेस्ट प्लेइंग टीम निवडता येते.

टीम निवडण्याचे निकष काय?

टीम निवडताना संबंधित दोन्ही संघातून मिळूण एकूण असे 11 खेळाडू निवडायचे असतात. एका संघातून जास्तीत जास्त 7 खेळाडू निवडता येतात. तर किमान 4 खेळाडू निवडावे लागतात.

टीम बनवण्याचे नियम काय?

प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार 11 खेळाडू निवडता येतात. मात्र यामध्ये विकेटकीपर, गोलंदाज, फलंदाज, ऑलराऊंडर खेळाडू असायला हवेत. तुम्ही निवडलेल्या टीममध्ये नक्कीच 2 प्रमुख किंवा अनुभवी खेळाडू असतात. त्या खेळाडूंना कर्णधार आणि उपकर्णधार निवडावं लागतं.

पॉइंट्स कसे मिळतात?

प्रत्येत खेळाडूच्या कामगिरीच्या आधारावर पॉइंट्स मिळतात. तु्म्ही निवडलेल्या कर्णधाराने चांगली कामगिरी केली, तर तुम्हाला दुप्पट पॉइंट्स मिळतात. तर उप कर्णधाराने चमकदार खेळी केल्यास दीड पट पॉइंट्स मिळतात. तर फलंदाजाला मिळणारे पॉइंट्स हे सिक्स, अर्धशतक आणि शतक याद्वारे ठरतात. तर गोलंदाजाला मिळणारे पॉइंट्स हे मेडन ओव्हर, विकेट्स याद्वारे ठरतात. तसेच फिल्डरला मिळणारे पॉइंट्स रन आऊट, स्टपिंग तसेच फंलदाजाला कॅचआऊट केल्यास मिळतात. विकेट घेतल्यास 25, रन आऊट केल्यास 1 तर कॅच घेतल्यास 8 पॉइंट्स मिळतात. अशा प्रकारे तुम्ही निवडलेल्या खेळाडूच्या कामगिरीच्या आधारावर पॉइंट्स मिळतात. त्यानंतर सर्व पॉइंट्स मोजले जातात. यानंतर एकूण पॉइंट्स मिळतात.

तुम्हालाही खेळायचंय?

जर तुम्हालाही या ड्रीम इलेव्हनद्वारे टीम निवडायची असेल, तर आधी ड्रीम 11 अॅप डाऊनलोड करावा लागेल. तुम्ही कोणाच्या संदर्भाने म्हणजेच रेफर कोडद्वारे अॅप डाऊनलोड केल्यास अतिरिक्त 100 रुपये मिळतील. यासाठी तुम्हाला लॉग इन करताना संबंधित रेफर कोड टाकावा लागेल. यानंतर तुम्ही प्रवेश कराल. यानंतर तुम्ही नियमांनुसार टीम निवडू शकता. यानंतर तुम्हाला यात सहभाही व्हावं लागेल. यानंतर ठराविक रक्कम गुंतवून तुम्ही खेळू शकता.

पैसे कसे मिळतात?

आता पर्यंत आपण टीम कशी निवडायची, त्याचे नियम यासर्व बाबी पाहिल्या. मात्र आता यातून पैसे कसे मिळतात, हा महत्वाचा प्रश्न आहे. याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. हे आपण जाणून घेणार आहोत. रॅंक तसेच चांगल्या पॉइंट्सच्या आधारावर ठराविक रक्कम मिळते. यामध्ये तुम्ही 50-60 रुपयेही जिंकू शकता. ड्रीम इलेव्हनमध्ये एंट्री फी (प्रवेश शुल्क) सह तुम्हाला यामध्ये सामील व्हावं लागतं. तुम्हाला जर क्रिकेटची चांगली जाण असेल, तर तुम्ही नक्कीच या ड्रीम इलेव्हनद्वारे मिळवू शकता.

संबंधित बातम्या :

Australia vs India, 1st Test : टीम इंडियाला पहिला धक्का, पृथ्वी शॉ शून्यावर बाद

Learn how to choose your favorite team on Dream 11 and how to win money