T20 World Cup 2022 : नेदरलँड्सला हरवणं टीम इंडियासाठी लकी, जाणून घ्या चमत्कारिक विक्रम!

दोन्हीवेळी टीम इंडियाने दोघांचा पराभव केला आहे. आजच्या मॅचमध्ये सुद्धा टीम इंडिया सहज पराभव करेल अशी स्थिती आहे.

T20 World Cup 2022 : नेदरलँड्सला हरवणं टीम इंडियासाठी लकी, जाणून घ्या चमत्कारिक विक्रम!
Team india
Image Credit source: BCCI
| Updated on: Oct 27, 2022 | 11:42 AM

सिडनी : विश्वचषकातील पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या टीमचा (Pakistan Team) पराभव केल्यानंतर टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंचा विश्वास अधिक दुनावला झाला आहे. कारण आशिया चषकात (Asia Cup) टीम इंडियाचा पराभव झाल्यापासून खेळाडूंवरती अधिक टीका होत होती. आज टीम इंडियाची दुसरी मॅच नेदरलँड्स टीमसोबत (Netherlands Team) होणार आहे. टीम इंडिया विश्वचषक (T20 World Cup 2022) जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. आज नेदरलँड्सविरुद्धचा सामना सिडनीच्या मैदानावर होणार आहे. नेदरलँड्स टीमने सुद्धा बांगलादेश टीमचा पराभव केल्याने चर्चेत आहेत.

याच्या आगोदर दोनवेळा टीम इंडियाची मॅच नेदरलँड्स टीमसोबत झाली आहे. दोन्हीवेळी टीम इंडियाने दोघांचा पराभव केला आहे. आजच्या मॅचमध्ये सुद्धा टीम इंडिया सहज पराभव करेल अशी स्थिती आहे.

नेदरलँड्स टीमला ज्यावेळी टीम इंडियाने हरवलं आहे, त्यावेळी टीम इंडिया उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली आहे. महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना नेदरलँड्स टीमला हरवल्यानंतर टीम इंडियाने विश्वचषक जिंकला होता. तसेच सौरव गांगुली कर्णधार असताना ज्यावेळी नेदरलँड्स पराभव केला होता. त्यावेळी टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली होती.

टीम इंडिया

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

नेदरलँड्स

स्कॉट एडवर्ड्स, कॉलिन अकरमन, शरीझ अहमद, लोगन व्हॅन बीक, टॉम कूपर, ब्रँडन ग्लोव्हर, टिम व्हॅन डर गुगेन, फ्रेड क्लासेन, बास डी लीडे, पॉल व्हॅन मीकरेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, स्टेफन मायगुरमनबर्ग, तेजा निदा , मॅक्स ओ’डॉड, टिम प्रिंगल, विक्रम सिंग.