अध्यक्ष होताच खर्गें यांनी सोनिया गांधी यांच्या ‘त्या’ नियमाला हरताळ फासला; पुढे काय?

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचं उदयपूर येथे संकल्प शिबीकर पार पडलं होतं. त्यात काँग्रेसच्या 50 टक्के पदांवर 50 वर्षाखालील वयाच्या नेत्यांना स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अध्यक्ष होताच खर्गें यांनी सोनिया गांधी यांच्या 'त्या' नियमाला हरताळ फासला; पुढे काय?
अध्यक्ष होताच खर्गें यांनी सोनिया गांधी यांच्या 'त्या' नियमाला हरताळ फासला; पुढे काय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 11:30 AM

नवी दिल्ली: मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यानंतर त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली आहे. खर्गे यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या (CWC) स्टिअरिंग कमिटीची म्हणजे संचालन समितीची स्थापना केली आहे. या समितीत 47 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शशी थरूर यांना स्थान देण्यात आलेलं नाही. मात्र, ही समिती तयार करताना खर्गे यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील एका नियमाची पायमल्ली केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचं उदयपूर येथे संकल्प शिबीकर पार पडलं होतं. त्यात काँग्रेसच्या 50 टक्के पदांवर 50 वर्षाखालील वयाच्या नेत्यांना स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच निवडणूक प्रचारावेळी पक्षात 50 टक्के तरुणांना स्थान देण्याची घोषणाही काँग्रेसने केली होती. मात्र, खर्गे यांना काँग्रेसच्या या घोषणेचा विसर पडल्याचं दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

खर्गे यांनी 47 जणांची स्टिअरिंग समिती स्थापन केली. त्यातील एक सदस्य वगळला तर 46 सदस्यांचं वय 50च्या पुढे आहे. त्यामुळे काँग्रेसला आपल्याच घोषणेचा विसर पडला की काय? अशी चर्चा सुरू आहे.

खर्गे यांच्या या 47 जणांच्या टीममध्ये तामिळनाडूच्या विरुधुनगर लोकसभा मतदारसंघातील खासदार बी. मनिकम टागोर हेच सर्वात कमी वयाचे आहेत. त्यांचं वय 47 वर्ष आहे. बाकी खर्गेंसहीत सर्व नेत्यांचं वय 50च्या पुढे आहे.

खर्गेंच्या या टीममधील प्रियंका गांधी आणि देवेंद्र यादव यांचं वय 50 आहे. राहुल गांधी 52 वर्षाचे आहेत. जितेंद्र सिंह हे 51 वर्षाचे आहेत. तर हरीश चौधरी 52, दिनेश गुंडू राव 53 आणि रणदीप सुरजेवाला 55 वर्षाचे आहेत. याशिवाय अजय माकन हे 58, केसी वेणुगोपाल 59, कुमारी शैलजा 60 वर्षाच्या आहेत. तर इतर सदस्यांचं वय 60 वर्षाच्या वरील आहे.

खर्गे यांनी आपल्या टीममध्ये राहुल गांधी यांच्या मर्जीतील नेत्यांना स्थान दिलं आहे. मात्र, त्यातील अधिक लोक 50 वर्षावरील आहेत. काँग्रेसच्या उदयपूर येथील चिंतन शिबीरात काँग्रेसच्या प्रत्येक पदावर 50 टक्के पदे तरुणांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात ब्लॉक, जिल्हा, प्रदेश आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यकारिणीत तरुणांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, खर्गे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर पक्षाच्या या निर्णयाला हारताळ फासला आहे.

Non Stop LIVE Update
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.