मनू भाकरचा मोठा निर्णय; ऑलिम्पिक पदक परत करणार, कारण तरी काय, कुणावर धरला नेम?

Manu Bhakar Return Olympic Medal : भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हिने ऑलिम्पिकमध्य नवीन रेकॉर्ड नावावर कोरला. तिने दोन कांस्य पदकांची कमाई केली. पण आता तिने ही पदकं परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मनू भाकरचा मोठा निर्णय; ऑलिम्पिक पदक परत करणार, कारण तरी काय, कुणावर धरला नेम?
मनू भाकर कांस्य पदक परत करणार
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 2:09 PM

भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Olympic Games Paris 2024) दोन कांस्य पदकांची कमाई केली होती. मायदेशी परतल्यावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रपतींनी तिचे कौतुक केले होते. तिची जंगी मिरवणूक सुद्धा तुम्हाला आठवत असेल. तर आता तिने ही दोन्ही कांस्य पदकं परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून आता चर्चा रंगली आहे. अनेकांना तिने असा का निर्णय घेतला याविषयी संभ्रम आहे.

पदकं का करत आहे परत?

मनू भाकर ही देशाची स्टार नेमबाज आहे. तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये या खेळात कांस्य पदकं पटकावली होती. दोन पदकं जिंकणारी ती देशाची पहिली खेळाडू ठरली आहे. पण तिचा हा आनंद अवघ्या पाच महिन्यातच मावळला. तिने जिंकलेल्या दोन्ही कांस्य पदकाचा रंग उडाला आहे. ही पदकं फिक्की पडली आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOA) ही पदकं परत मागवली आहेत.

हे सुद्धा वाचा

ऑलिम्पिक समितीवर जगभरातून टीका

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मनूला नवीन पदकं देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सध्याची तिची पदकं परत मागवली जात आहेत. जगभरातील खेळाडूंनी अशाच प्रकारच्य तक्रारी केल्याचे समोर आले आहे. त्यांना देण्यात आलेल्या पदकांचा रंग उडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 100 हून अधिक खेळाडूंनी अशी तक्रार केल्याने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहे. इतक्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत असे प्रकार घडल्याने क्रीडा क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे.

दोन पदकांचा विक्रमी नेम

मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक जिंकले होते. तर याच प्रकारात तिने मिश्र दुहेरी गटातही कांस्य पदकाचा वेध घेतला. सरबजोत सिंग हा तिचा या गटात सथीदार होता. अशा प्रकारची कामगिरी करणारा ती देशाची पहिली खेळाडू ठरली.  मोनने डी पॅरीस या संस्थेने ही पदकं तयार केली आहेत. हे मेडल खराब नाहीत. बहुतांश पदकांचा केवळ रंग उडाल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही पदकं बदलून देण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....