
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पूर्व पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेच. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यात विवाद सुरू असून हसीन जहांने आता पुन्हा नवे गंभीर आरोप केले आहेत. मात्र यावेळी तिची भाषा फारच आक्रमक आहे. शमीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीनंतर हसीन जहांने आता सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात तिने असं सूचित करण्याचा प्रयत्न केला की, तिला ‘धमकावण्याचे’ प्रयत्न करण्यात आले होते, पण ती कधीच दबावाला बळी पडली नाही. मी कोणालाच माझं आयुष्य बरबाद करू देणार नाही, असंही तिने स्पष्ट केलं. तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये, हसीन जहांने असंही म्हटलं ती, 2018 साली देखील तिला कोणतीच भीती नव्हती. तिने शमी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध जाधवपूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरचा हा संदर्भ होता. त्यावेळी तिने शमीवर घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता.
हसीन जहांची पोस्ट काय ?
हसीन जहांने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. “पागल, मोकाट कुत्र्यांची मला भीती वाटली असती तर मी 2018 सालीच घाबरले असते. मला घाबरवण्याचा, मला झुकवण्याचा, मला नष्ट करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, अल्लाहच्या कृपेने मी अधिकाधिक बलवान होत राहीन, इंशाअल्लाह.” असं तिने लिहीलं आहे.
मोहम्मद शमीच्या मुलाखतीनंतर हसीन जहांने लगेचच सोशल मीडियावर ही पोस्ट टाकली आहे. त्या मुलाखतीत शमी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टपणे बोलला होता आणि भूतकाळात जगायचं नाहीये, असंही त्याने स्पष्ट केलं होतं. तुला काही पश्चात्ताप आहे का असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता, तेव्हा तो म्हणाला – ” आता ते सगळं सोडा. मला भूतकाळाचा कधीच पश्चात्ताप होत नाही. जे झालं ते झालं. कोणालाही दोष देऊ इच्छित नाही, स्वतःलाही नाही. मला माझ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मला या वादांची गरज नाही.” असं शमीने सांगितलं.
Mohammed Shami-Hasin Jahan : हसीन जहाँने दिली खुशखबरी, मोहम्मद शमीबद्दल म्हणाली..
मोहम्मद शमी आणि हसीन जहां यांनी 2014 साली लग्न केलं पण 4 वर्षानंतर ते दोघं वेगळे राहू लागले. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज असलेल्या शमीवर, हसीन जहांने घटस्फोटाच्या लढाईदरम्यान अनेक आरोप केले, शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोपही तिने लावला होता. अलिकडेच तिने शमीला ‘महिलांचा शौकीन’ म्णत पुन्हा टीकास्त्र सोडलं होतं. आणि तो त्यांच्या मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष देत नाही आणि त्याऐवजी त्याच्या मैत्रिणींवर पैसे खर्च करतो असा आरोपही लावला होता.