MS Dhoni: धोनीला डेट केल्यामुळे बदनाम झाले; दाक्षिणात्य अभिनेत्रीचा खळबळनजक खुलासा

MS Dhoni affairs: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा चाहतावर्ग प्रचंड आहे. त्याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अलीकडेच आपली प्रदीर्घ आयपीएल कारकीर्द संपवली. त्यानंतर धोनी आता खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

MS Dhoni: धोनीला डेट केल्यामुळे बदनाम झाले; दाक्षिणात्य अभिनेत्रीचा खळबळनजक खुलासा
Dhoni
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 19, 2026 | 8:16 AM

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी… या केवळ नावानेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ‘कॅप्टन कूल’ म्हणून आपली ओळख निर्माण करणारा हा चॅम्पियन एक सुवर्ण अध्याय आहे. एक उत्कृष्ट कर्णधार म्हणून अशक्य गोष्ट शक्य करणारा सर्वोत्तम फिनिशर म्हणून धोनी ओळखला जातो. त्याचे लाखो चाहते आहेत. आयपीएलमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर धोनी खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

‘धोनी’ हा बायोपिक धोनीची क्रिकेट कारकीर्द आणि वैयक्तिक आयुष्य काही प्रमाणात कव्हर करण्यासाठी प्रदर्शित झाला. यामध्ये त्याच्या प्रेमप्रकरणांचाही उल्लेख आहे. त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडचा मृत्यू.. आणि त्यानंतर साक्षीची ओळख, प्रेम आणि लग्न यांसारख्या घटना यात पाहायला मिळतात. तसेच असेही वृत्त होते की धोनीची त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्याचे प्रेमप्रकरण सुरु होते. त्यापैकी, फार कमी लोकांना हे माहीत आहे की एक टॉलीवूड सुंदरी त्याच्यासोबत वर्षभर रिलेशनशिपमध्ये होती आणि नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. ती नायिका कोण आहे? ब्रेकअप का झाला? चला जाणून घेऊया…

Loading...

कोण आहे ती अभिनेत्री?

पूर्वी धोनीसोबत रिलेशनशिपमध्ये असलेली ती अभिनेत्री म्हणजे राय लक्ष्मी. तिने तमिळ आणि तेलुगू इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. कर्नाटकात जन्मलेल्या या अभिनेत्रीने जरी कमी चित्रपट केले असले तरी, तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवली आहे. तिने ‘कांचनमाला केबल टीव्ही’ या चित्रपटाद्वारे तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर, ‘कांचना’ या चित्रपटाने तिला चांगली संधी दिली. त्याचप्रमाणे, ‘सरदार गब्बर सिंग’ आणि ‘कैदी नं. १५०’ यांसारख्या मेगा हिरोंच्या चित्रपटांमधील आयटम साँग्समुळे ती तेलुगू प्रेक्षकांच्या अधिक जवळ आली आहे. सध्या ती विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करण्यात व्यस्त आहे.

डेटिंगमुळे बदनाम झाले…

राय लक्ष्मीने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, २००८ च्या आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार असताना ती त्याला डेट करत होती. तिने स्पष्ट केले की, एक वर्ष नात्यात राहिल्यानंतर त्यांनी सामंजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तिने सांगितले की, त्यांच्यात कोणताही वाद न होता त्यांचे नाते तुटले. मात्र, तिने सांगितले की ब्रेकअप होऊनही ते अजूनही एकमेकांचा आदर करतात. धोनीनंतर तिच्या आयुष्यात झालेल्या अनेक ब्रेकअपबद्दलही तिने सांगितले. पण तिने सांगितले की, त्या गोष्टींबद्दल तिला कधीही वाईट वाटले नाही. पण धोनीला डेट केल्यामुळे बदनाम झाल्याचे तिने सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us