कॅप्टन कूल धोनीच्या आई वडिलांनी कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली, रुग्णालयातून डिस्चार्ज

| Updated on: Apr 30, 2021 | 7:53 AM

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या (MS Doni) आई बाबांनीही कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली आहे. त्यांना रांचीमधल्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (MS Dhoni Mom And Dad Covid 19 Test Negative Discharge From Hospital)

कॅप्टन कूल धोनीच्या आई वडिलांनी कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली, रुग्णालयातून डिस्चार्ज
कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या (MS Doni) आई बाबांनीही कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली आहे.
Follow us on

रांची :  कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या (MS Doni) आई बाबांनीही कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली आहे. त्यांना रांचीमधल्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर आता त्यांच्या घरी आयसोलेट करण्यात आलं आहे, अशी माहिती मिळत आहे. आई बाबांना कोरोनाची लागण झाल्यानंतरही धोनीने चेन्नईचं नेतृत्व करणं सुरुच ठेवलं. (MS Dhoni Mom And Dad Covid 19 Test Negative Discharge From Hospital)

धोनीच्या आई बाबांची कोरोनावर यशस्वीपणे मात

काही दिवसांपूर्वी धोनीच्या आई बाबांना कोरोनाची लागण झाली होती. ते वयस्कर असल्याने चिंता अधिक होती. सगळ्या क्रिकेट फॅन्सना त्यांच्या प्रकृतीची काळजी लागून राहिली होती. परंतु काहीच दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी आता कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. त्यांना रांचीमधल्या एका खाजगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. धोनीच्या रांचीमधल्या घरी त्यांना आता आयसोलेट करण्यात आलं आहे.

चेन्नईचं नेतृत्व करणाऱ्या धोनीसाठी गुड न्यूज

पाठीमागील आठवड्यात धोनीचे बाबा पान सिंग धोनी (Pan Singh Dhoni) आणि आई देविका देवी (Devika Devi Dhoni) यांना कोरोनाची लागण झाली होती. धोनीची पत्नी साक्षीने (Sakshi Dhoni) त्यांच्या तब्येतीविषयी चाहत्यांना सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. रांचीमधल्या पल्स सुपर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र सुदैवाने दोघांनीही कोरोनावर एकाच आठवड्यात यशस्वीपणे मात केली आहे. त्यांच्या तब्येतीविषयी धोनीला काळजी लागून राहिली होती. मात्र आता त्यांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकल्यानंतर धोनी टेन्शन फ्री झाला आहे. तो ही चेन्नईला आयपीएलमधील पुढील लढाया जिंकवून देण्यासाठी आसुसला आहे.

चेन्नईची विजयी घौडदौड

आयपीएलच्या 14 व्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईची टीम सध्या जोरदार फॉर्मात आहे. चेन्नईने खेळलेल्या 6 सामन्यांपैकी 5 सामन्यांत धोनीच्या यलो आर्मीने विजय संपादन केला आहे तर केवळ एका सामन्यात चेन्नईला पराभवाचं तोंड पाहायला लागलं आहे. चेन्नईने 6 सामन्यांपैकी 5 सामने जिंकून 10 गुण मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

(MS Dhoni Mom And Dad Covid 19 Test Negative Discharge From Hospital)

हे ही वाचा :

IPL 2021 : चालू मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने पत्नीला किस केलं, जहीर खानच्या बायकोने फोटो ट्विट केला अन्….

IPL 2021 : आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असा योगायोग, सलग तीन मॅचमध्ये ‘असा’ कारनामा! चर्चेला उधाण…

DC vs KKR IPL 2021 Match 25 Result | पृथ्वी शॉचा झंझावात, दिल्ली कॅपिट्लसची कोलकात्यावर 7 विकेट्सने मात