CSK vs LSG : असं धोनीच करु शकतो, एका हाताने SIX, CSK साठी 11 चेंडूत केली कमाल, VIDEO

CSK vs LSG : आयपीएल 2025 च्या 30 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पराभवाची मालिका मोडीत काढली. या विजयात CSK चा कॅप्टन धोनीने महत्त्वाची भूमिका बजावली. सीएसकेला 30 चेंडूत विजयासाठी 55 धावांची आवश्यकता असताना महेंद्रसिंह धोनीने मैदानावर पाऊल ठेवलं होतं.

CSK vs LSG : असं धोनीच करु शकतो, एका हाताने SIX, CSK साठी 11 चेंडूत केली कमाल, VIDEO
MS Dhoni
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 15, 2025 | 8:28 AM

लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध अखेर चेन्नई सुपर किंग्सने पराभवाची मालिका मोडीत काढली. IPL 2025 च्या 30 व्या सामन्यात धोनीच्या CSK ने शानदार विजयाची नोंद केली. लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी केली. LSG ने 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 166 धावा केल्या. प्रत्युत्तरात CSK च्या टीमने 19.3 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून विजयी लक्ष्य गाठलं. या विजयात कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने महत्त्वाची भूमिका बजावली. धोनी मॅच विनिंग इनिंग खेळला. यामध्ये शिवम दुबेने त्याला साथ दिली. दोघांनी मिळून टीमला विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचवलं. धोनीने केवळ 11 चेंडूत सामना फिरवला. या विजयानंतरही चेन्नईची टीम पॉइंट्स टेबलमध्ये 10 व्या नंबरवर आहे.

सीएसकेला 30 चेंडूत विजयासाठी 55 धावांची आवश्यकता असताना महेंद्रसिंह धोनीने मैदानावर पाऊल ठेवलं. त्यानंतर धोनी अशी इनिंग खेळला, सामन्याचा नूरच पालटला. धोनीने केवळ 11 चेंडूत 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने नाबाद 26 धावा केल्या. धोनीने या सामन्यात एकमेव सिक्स मारला, तो सुद्धा एकाहाताने. इम्पॅक्ट प्लेयर शिवम दुबेसोबत मिळून त्याने 27 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. शिवम दुबेने 37 चेंडूत 2 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने नाबाद 43 धावा केल्या. सीएसकेचा 7 सामन्यात हा दुसरा विजय आहे. पॉइंट्स टेबलमध्ये अजूनही ते तळाला आहेत. LSG ची टीम पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या नंबरवर आहे.

अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू

LSG विरुद्ध CSK च्या कॅप्टनने शानदार प्रदर्शन केलं. धोनीने एक कॅच, एक स्टम्पिंग आणि एक रनआऊट केलं. या प्रदर्शनासह त्याने सलग पाच सामन्यातील पराभवाची मालिका मोडीत काढली. रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर त्याने आयुष बडोनीची स्टम्पिंग करुन आयपीएलमध्ये आपली 200 वी शिकार केली. अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. या लिस्टमध्ये दिनेश कार्तिक आणि रिद्धिमान साहा आहेत. पण ते धोनीपेक्षा खूप मागे आहेत. मॅच दरम्यान महेंद्र सिंह धोनीने आपल्या चपळाईने सर्वांना चकीत केलं. लखनऊ सुपर जायंट्सच्या इनिंग दरम्यान 20 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर अब्दुल समदला वेगळ्या पद्धतीने रनआऊट करुन त्याने सर्वांना चकीत केलं.