Video : टीम इंडिया T20 विश्वचषक पुन्हा जिंकून देण्यासाठी एमएस धोनी करणार मदत, पाहा व्हिडीओ

मागच्या काही दिवसांपासून ओरिओ बिस्कीटची जाहिरात करण्यात व्यस्त असलेल्या धोनी पुन्हा जुन्या लुकमध्ये दिसला आहे.

Video : टीम इंडिया T20 विश्वचषक पुन्हा जिंकून देण्यासाठी एमएस धोनी करणार मदत, पाहा व्हिडीओ
महेंद्रसिंग धोनी
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 05, 2022 | 7:14 PM

टीम इंडियाने (Team India) 2011 साली T20 विश्वचषक जिंकून दिला होता. त्यावेळी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं (Mahendrasingh Dhoni) त्याचं कौतुक अधिक झालं होतं. कारण त्यांच्या गळ्यात कर्णधारपदाची सुत्र अचानक घातली होती. तसेच विश्वचषक खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु त्याच्या चातुर्याने त्याने विश्वचषक (World Cup) जिंकून दिला. त्याची आज देखील चाहते आठवण सांगतात.

मागच्या काही दिवसांपासून ओरिओ बिस्कीटची जाहिरात करण्यात व्यस्त असलेल्या धोनी पुन्हा जुन्या लुकमध्ये दिसला आहे. त्याच्यावर मागच्या काही दिवसांपासून टीका सुद्धा केली जात आहे.

ज्यावेळी धोनीने विश्वचषक जिंकून दिला होता. त्यावेळी त्याची जी हेअरस्टाईल होती. ती त्याने ओरिओ बिस्कीटची जाहिरात करताना पुन्हा केली आहे. त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.