मुंबई इंडियन्सचे दोन खेळाडू, ज्यांनी विजयाला दूर नेलं आणि पुन्हा जिंकूनही दिलं!

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

हैदराबाद : मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएलच्या थरारक फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अवघ्या 1 धावाने पराभव केला. लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर CSK च्या शार्दूल ठाकूरची विकेट घेतली आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची धडधड थांबली. मुंबईने चौथ्यांदा आयपीएल चषक जिंकून इतिहास रचला. खरं तर मुंबईची बाजू सुरुवातीपासूनच वरचढ होती, पण मुंबई इंडियन्सच्या दोन गोलंदाजांमुळे हा […]

मुंबई इंडियन्सचे दोन खेळाडू, ज्यांनी विजयाला दूर नेलं आणि पुन्हा जिंकूनही दिलं!
Follow us on

हैदराबाद : मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएलच्या थरारक फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अवघ्या 1 धावाने पराभव केला. लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर CSK च्या शार्दूल ठाकूरची विकेट घेतली आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची धडधड थांबली. मुंबईने चौथ्यांदा आयपीएल चषक जिंकून इतिहास रचला. खरं तर मुंबईची बाजू सुरुवातीपासूनच वरचढ होती, पण मुंबई इंडियन्सच्या दोन गोलंदाजांमुळे हा विजय दूर जाताना दिसला आणि याच दोन गोलंदाजांनी पुन्हा जिंकून देण्यातही महत्त्वाची भूमिका निभावली.

लसिथ मलिंगाचा महागडा स्पेल

चेन्नईला विजयासाठी केवळ 150 धावांचं आव्हान दिलेलं असल्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांनी अगोदरपासूनच सावध पाऊल टाकलं. पण सर्वात अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाच्या महागड्या षटकांनी हा विजय दूर जाताना दिसला. मलिंगाने एकूण 49 धावा दिल्या. पण मलिंगानेच सामना जिंकून देण्यातही सर्वात महत्त्वाची भूमिका निभावली. अखेरच्या चेंडूवर चेन्नईला विजयासाठी दोन धावा आवश्यक होत्या आणि स्ट्राईकवर शार्दूल ठाकूर होता. मलिंगाचा अनुभव इथे कामी आला आणि त्याने या चेंडूवर शार्दूलला बाद करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. जसप्रीत बुमराने सर्वात चिकाटीने गोलंदाजी करत दोन विकेट घेतल्या आणि चार षटकात केवळ 14 धावा दिल्या. पण मलिंगाच्या महागड्या षटकांमुळे चेन्नईची बाजू मजबूत झाली. अखेरच्या षटकात मलिंगाचा पर्याय तर होताच, शिवाय हार्दिक पंड्याही होता. पण कर्णधार रोहित शर्माने मलिंगावरच विश्वास दाखवला आणि मलिंगाने दूर गेलेला विजय खेचून आणला.

कृणाल पंड्याची महागडी ओव्हर आणि पुन्हा कमबॅक

16 व्या षटकात मलिंगाची धुलाई झालेली असल्यामुळे पुन्हा एकदा जसप्रीत बुमराला आणावं लागलं. मलिंगाच्या त्या षटकामध्ये एकूण 20 धावा ठोकल्या होत्या. जसप्रीत बुमराने पुन्हा एकदा चिकाटीने गोलंदाजी केली आणि केवळ तीन धावा दिल्या. यानंतर हार्दिक पंड्याऐवजी रोहित शर्माने कृणाल पंड्यावर विश्वास दाखवला. चेन्नईचा सलामीवीर फलंदाज शेन वॉट्सनला रोखण्यासाठी काही तरी चमत्काराचीच अपेक्षा होती. पण उलटं झालं आणि कृणाल पंड्याच्या त्या षटकात तब्बल 20 धावा खर्च झाल्या. विजय मुंबईपासून बराच दूर गेला होता. पण कृणाल पंड्याच धावून आला आणि त्याने स्फोटक फलंदाजी करत असलेल्या शेन वॉट्सनला परत पाठवलं. यामुळे मुंबईचा विजय सोपा झाला. शेन वॉट्सननंतर आलेल्या शार्दूल ठाकूरची विकेट घेऊन मलिंगाने मुंबईला चौथ्यांदा चॅम्पियन बनवलं.