सुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद

सुरेश रैनाच्या आत्याच्या घरावर हल्ला करणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात, पंजाब पोलिसांना यश आलं आहे. (Murder case of Suresh Raina’s family members solved)

सुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद
| Updated on: Sep 16, 2020 | 8:53 PM

सुरेश रैनाच्या आत्याच्या घरावर हल्ला करणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात, पंजाब पोलिसांना यश आलं आहे.  दरोडेखोरांच्या हल्ल्यात काकांचे निधन झाल्यानंतर क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या आत्तेभावानेही प्राण सोडले होते. (Suresh Raina)  पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात राहणाऱ्या रैनाच्या आत्याच्या कुटुंबावर शुक्रवार 28 ऑगस्टच्या रात्री दरोडेखोरांनी हल्ला केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात “काले कच्छेवाला” टोळीचे तीन ते चार दरोडेखोर चोरीच्या इराद्याने आले होते. पठाणकोटमधील माधोपूरजवळील थारियाल गावात राहणाऱ्या अशोक कुमार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर टोळीने हल्ला केला.

हल्ल्याच्या वेळी कुटुंबातील सर्व जण आपल्या घरातील गच्चीवर झोपले होते. 58 वर्षीय अशोक कुमार यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला होता.  (Murder case of Suresh Raina’s family members solved by Punjab Police)

VIDEO