AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीनिवासन आधी म्हणाले रैनाच्या डोक्यात यशाची झिंग, आता म्हणतात…

"चेन्नई सुपरकिंग्ज' संघात सुरेश रैनाचे योगदान अद्वितीय आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे वाईट वाटते" असे श्रीनिवासन म्हणाले.

श्रीनिवासन आधी म्हणाले रैनाच्या डोक्यात यशाची झिंग, आता म्हणतात...
| Updated on: Sep 01, 2020 | 12:52 PM
Share

मुंबई : ‘चेन्नई सुपरकिंग्ज’चा अग्रणी फलंदाज सुरेश रैना यूएईमध्ये रंगणारी आयपीएल स्पर्धा सोडून भारतात परतला. ‘सीएसके’ संघाचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी रैनाच्या डोक्यात यशाची झिंग गेल्याचे वक्तव्य आधी केले होते. मात्र आता सारवासारव करत त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचा दावा केला आहे. (N Srinivasan claims CSK always by Suresh Raina side comment taken out of context)

“चेन्नई सुपरकिंग्ज’ संघात सुरेश रैनाचे योगदान अद्वितीय आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे वाईट वाटते” असे श्रीनिवासन ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. “धोनीसारखी हॉटेल रुम न मिळाल्याने रैना नाराज झाला. रैनाच्या डोक्यात यशाची झिंग गेली आहे. तो 11 कोटी रुपये गमवेल, मात्र पगार मिळाला नाही, की डोके ठिकाणावर येईल” असे श्रीनिवासन म्हणाल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी माध्यमांनी दिले होते.

“रैना कोणत्या परिस्थितीत आहे, हे आपल्याला समजून घेणे गरजेच आहे. त्याला त्याची स्पेस देणे गरजेचे आहे” असे आता श्रीनिवासन म्हणतात. “2008 मध्ये संघात निवड झाल्यापासून तो चेन्नईकडून खेळत आहे. तो ‘चेन्नई बॉय’ आहे. धोनीला ‘थाला’ तर रैनाला ‘चिन्नाथाला’ (सेकंड इन कमांडर) अशी ओळख मिळाली असल्याचेही श्रीनिवासन म्हणाले.

“प्रायमा डोनाचा विपर्यास”

रैनासारख्या शानदार खेळाडूसोबत संघ नेहमीच पाठीशी उभा आहे. या कठीण काळात रैनाला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, असे श्रीनिवासन म्हणाले. “क्रिकेटपटू प्रायमा डोना (prima donna) असल्याचे मी म्हणालो, त्याचा नकारात्मक अर्थ होत नाही. प्रायमा डोना म्हणजे ओपेरातील मुख्य गायक. त्याचप्रमाणे क्रिकेटपटूही नेहमी फ्रंटलाईनला असतात” असे स्पष्टीकरण श्रीनिवासन यांनी दिले.

चेन्नईचा धडाकेबाज खेळाडू सुरेश रैना आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे वृत्त समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. रैना काल तातडीने संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE वरुन परतला. वैयक्तिक कारणात्सव त्याने माघार घेतल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. (N Srinivasan claims CSK always by Suresh Raina side comment taken out of context)

रैनाच्या काकांचे निधन

दरोडेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात सुरेश रैना याचे काका अशोक कुमार यांचे निधन झाले. अशोक कुमार यांच्या 80 वर्षीय मातोश्री सत्या देवी, पत्नी आशा देवी, मुले अपिन आणि कौशल जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

33 वर्षीय सुरेश रैनाने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटला अलविदा केला, त्याच दिवशी त्याचा मित्र असलेल्या रैनानेही निवृत्ती जाहीर केली. मात्र रैना आयपीएलच्या सराव सत्रात सहभागी झाला होता. तो संघासोबत दुबईला रवाना झाला होता.

(N Srinivasan claims CSK always by Suresh Raina side comment taken out of context)

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.