AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दरोडेखोरांचा हल्ला, क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकांचे निधन

पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात राहणाऱ्या रैनाच्या काकांच्या कुटुंबावर शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी हल्ला केला होता.

दरोडेखोरांचा हल्ला, क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकांचे निधन
| Updated on: Aug 30, 2020 | 11:41 AM
Share

चंदिगढ : दरोडेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या काकांचे निधन झाले. रैनाच्या काकीसह कुटुंबातील चार सदस्य जखमी झाले आहेत. याच कारणास्तव रैना आयपीएलमधून माघार घेत मायदेशी परतल्याचे बोलले जाते. (Cricketer Suresh Raina’s Uncle Killed By Robbers In Pathankot Punjab)

चेन्नईचा धडाकेबाज खेळाडू सुरेश रैना आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे वृत्त समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. रैना काल तातडीने संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE वरुन परतला. वैयक्तिक कारणात्सव त्याने माघार घेतल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती.

पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात राहणाऱ्या रैनाच्या काकांच्या कुटुंबावर शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी हल्ला केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात “काले कच्छेवाला” टोळीचे तीन ते चार दरोडेखोर चोरीच्या इराद्याने आले होते. पठाणकोटमधील माधोपूरजवळील थारियाल गावात राहणाऱ्या अशोक कुमार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर टोळीने हल्ला केला.

हल्ल्याच्या वेळी कुटुंबातील सर्व जण आपल्या घरातील गच्चीवर झोपले होते. 58 वर्षीय अशोक कुमार यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. घरातील काही रोकड आणि सोने लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला.

अशोक कुमार यांच्या 80 वर्षीय मातोश्री सत्या देवी, पत्नी आशा देवी, मुले अपिन आणि कौशल जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सत्या देवी यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे, तर इतरांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सुरेश रैना आणि अशोक कुमार कुटुंबातील नातेसंबंध सुरुवातीला अस्पष्ट होते, मात्र काल रात्री पोलिसांनी त्यास दुजोरा दिला. (Cricketer Suresh Raina’s Uncle Killed By Robbers In Pathankot Punjab)

सुरेश रैनाची ‘आयपीएल’मधून माघार

“सुरेश रैना खासगी कारणामुळे भारतात परतला आहे. तो आयपीएल स्पर्धेसाठी उपलब्ध नसेल. चेन्नई सुपर किंग्ज या काळात रैना आणि त्याच्या कुटुंबियांच्या पाठिशी आहे” असं CSK ने ट्विट केलं होतं.

33 वर्षीय सुरेश रैनाने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटला अलविदा केला, त्याच दिवशी त्याचा मित्र असलेल्या रैनानेही निवृत्ती जाहीर केली. मात्र रैना आयपीएलच्या सराव सत्रात सहभागी झाला होता. तो संघासोबत दुबईला रवाना झाला होता.  रैनाने कालच ट्विट करुन, जगाची गती मंदावली असेल तर तुम्ही स्वत:चा शोध घेऊ शकता, अशा आशयाचं ट्विट केलं होतं. (Cricketer Suresh Raina’s Uncle Killed By Robbers In Pathankot Punjab)

संबंधित बातम्या 

चेन्नई सुपर किंग्जला धक्क्यावर धक्के, सुरेश रैना IPL मधून बाहेर

आयपीएल सुरु होण्याआधीच CSK संघाला मोठा झटका, सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोना   

भारतीय संघात ‘हा’ खेळाडू असता, तर भारत 2019 चा विश्वचषक जिंकू शकला असता : सुरेश रैना

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.