Suresh Raina | मी सुद्धा तुझ्यासोबत, धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीपाठोपाठ आता त्याचा सहकारी सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर केली. (Cricketer Suresh Raina Announce Retirement)

Suresh Raina | मी सुद्धा तुझ्यासोबत, धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीपाठोपाठ आता त्याचा सहकारी सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर केली. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, सुरेश रैनानेही इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून या प्रवासात मी सुद्धा तुझ्यासोबत आहे, असं म्हणत, निवृत्ती जाहीर केली. धोनी आणि रैना यांनी एकाच दिवशी एकाच वेळी निवृत्ती जाहीर केल्याने, क्रिकेटचाहत्यांसाठी हा अचानक बसलेला धक्का आहे. (Cricketer Suresh Raina Announce Retirement)

सुरेश रैनाने 18 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 768 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक 7 अर्धशतकांचा समावेश आहे. सुरेश रैनाने वन डे आणि टी 20 सामन्यांमध्ये चांगलीच चमक दाखवली होती.

रैनाने 226 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 5 हजार 615 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतकं, 36 अर्धशतकांचा समावेश आहे.

सुरेश रैनाने 78 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 1 हजार 604 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

सुरेश रैनाने 193 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 5 हजार 368 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक, 38 अर्धशतक केले आहेत. (Cricketer Suresh Raina Announce Retirement)

संबंधित बातम्या :

वय वाढलं, पण फिटनेसबद्दल बोलण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती, धोनीच्या निवृत्तीची कारणे कोणती?

MS Dhoni Retirement | महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, आयपीएलमध्ये खेळणार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *