AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नताशाचा रोमँटिक अंदाज, स्विमिंग पूलमध्ये हार्दिकला किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर

नताशाने शेअर केलेल्या फोटोत ते दोघेही एका स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळतंय. याच फोटोत ती हार्दिकला किस करताना दिसून येत आहे. Natasa kiss Hardik

नताशाचा रोमँटिक अंदाज, स्विमिंग पूलमध्ये हार्दिकला किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर
Natasa Stankovic kiss Hardik pandya
| Updated on: Mar 27, 2021 | 1:13 PM
Share

मुंबई :  टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik pandya) आपल्या बॅटिंगने तर चर्चेत असतोच परंतु त्याच्या पत्नीसोबतच्या अनेक रोमँटिक फोटोमुळेही तो अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. त्याची पत्नी नताशा स्टेनकोविकने (Natasa Stankovic) स्विमिंग पूलमध्ये हार्दिकला किस करत असतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांनाही विशेष भावली आहे. (Natasa Stankovic kiss Hardik pandya in swimming pool Photo Viral)

हार्दिक नताशाची रोमँटिक केमिस्ट्री

हार्दिकची पत्नी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. क्षणाक्षणाची माहिती ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे देत असते. कधी तिचे एकटीचे तर कधी हार्दिकसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंमधून तिची हार्दिकबरोबरची रोमँटिक केमिस्ट्री नेहमीच दिसून येत येते.

“मेरा सनशाईन हार्दिक पांड्या…”

नताशाने शेअर केलेल्या फोटोत ते दोघेही एका स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळतंय. याच फोटोत ती हार्दिकला किस करताना दिसून येत आहे. हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना तिने कॅप्शन दिलंय, “मेरा सनशाईन हार्दिक पांड्या…”

फॅन्सचा लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस

नशानाने शेअर केलेल्या फोटोंवर त्यांच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय. अनेकांनी दोघांना शुभेच्छा देणाऱ्या कमेंट केल्या आहेत. तर काहींनी त्यांच्या रोमँटिंक अंदाजाची तारीफ केली आहे.

हार्दिक नताशा सेलिब्रेटी कपल

हार्दिक आणि नताशा हे सेलिब्रेटी कपल आहे. नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे ही जोडी चर्चेत असते. गेल्याच वर्षी त्यांनी एका बाळाला जन्म दिला आहे. त्या बाळाचं नाव त्यांनी अगस्त्य ठेवलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात हार्दिकच्या 16 चेंडूत 35 धावा

पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिकने आक्रमक अंदाजात बॅटिंग केली. त्याने 16 चेंडूवर 35 धावा ठोकल्या. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हार्दिकने इंग्लंडच्या डावादरम्यान गोलंदाजी केली नाही.

हे ही वाचा :

Video : सॅम करनने भडकवलं, हार्दिक करनच्या मागे पळाला, अंपायर्सने थांबवलं, पाहा मैदानात काय काय घडलं…?

Ind vs Eng : एका रन्सने शतक हुकलं, आकाशाकडे पाहत दिवंगत पित्याला ‘सॉरी’ म्हटलं, पुण्यात बेन स्टोक्सचा झंझावात!

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.