‘फादर्स डे’च्या दिवशी भारत-पाक सामना, ‘बाप’ जाहिरातीने पाकिस्तानी चिडले

| Updated on: Jun 11, 2019 | 4:06 PM

या सामन्यापूर्वी पाकिस्तानला डिवचणं सोशल मीडियावर सुरु झालंय. याचं कारण म्हणजे सामन्यासाठी आलेली जाहिरात सोशल मीडियावर हिट ठरली आहे. या जाहिरातीवर पाकिस्तानी चाहते चिडले आहेत.

फादर्स डेच्या दिवशी भारत-पाक सामना, बाप जाहिरातीने पाकिस्तानी चिडले
Follow us on

मुंबई : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकातला (ICC World Cup 2019) मच अवेटेड सामना येत्या रविवारी म्हणजे 16 जूनला होतोय. भारत विरुद्ध पाकिस्तान असा हा सामना होईल. पण या सामन्यापूर्वी पाकिस्तानला डिवचणं सोशल मीडियावर सुरु झालंय. याचं कारण म्हणजे सामन्यासाठी आलेली जाहिरात सोशल मीडियावर हिट ठरली आहे. या जाहिरातीवर पाकिस्तानी चाहते चिडले आहेत.

भारत-पाक सामन्याच्या निमित्ताने 2015 च्या विश्वचषकात स्टार स्पोर्ट्सने एक प्रोमो रिलीज केला होता. ‘मौका मौका’ जाहिरात प्रचंड गाजली होती. यावर्षी ‘मौका मौका’ जाहिरात नव्या रुपात आली आहे. भारत-पाक सामना ज्या दिवशी आहे, त्याच दिवशी फादर्स डे आहे. त्यामुळे या जाहिरातीतून पाकिस्तानची फिरकी घेतली आहे. पाकिस्तानला विश्वचषकात भारतासोबत एकदाही विजय मिळवता आलेला नाही. पण सोशल मीडियावर मात्र पाकिस्तानी शब्दांचं युद्ध जिंकण्यासाठी संघर्ष करत आहेत.

अभिनेता विकास मल्होत्राने या जाहिरातीत पाकिस्तानी मुलाची भूमिका साकारली आहे, जो बांगलादेशी चाहत्याला कधीही हार मानू नये ही शिकवण आपल्या वडिलांनी दिली असल्याचं सांगतो. तेवढ्यात समोर बसलेला भारतीय चाहता म्हणतो, “मी हे तुला कधी सांगितलं?” या ‘बाप’ जाहिरातीमुळे पाकिस्तानी नाराज झाल्याचं दिसतंय. पण भारतीय चाहत्यांमध्ये या सामन्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

VIDEO : पाहा जाहिरात