NZ vs PAK 2nd Test | पाकिस्तानविरुद्ध केन विल्यमसन तळपला, सलग दुसरं शतक, न्यूझीलंड मजबूत स्थितीत

| Updated on: Jan 04, 2021 | 1:59 PM

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ख्राईस्टचर्च येथे दुसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे.

NZ vs PAK 2nd Test | पाकिस्तानविरुद्ध केन विल्यमसन तळपला, सलग दुसरं शतक, न्यूझीलंड मजबूत स्थितीत
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमन्सनचे शानदार शतक
Follow us on

ख्राईस्टचर्च | न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमन्सने (Kane Willaimson) आपल्या फलंदाजाीचा तडाखा कायम ठेवला आहे. केनने पाकिस्तानविरोधातील दुसऱ्या कसोटीतही शानदार शतक लगावलं आहे. त्याची ही सलग तिसरी शतकी खेळी ठरली आहे. पाकिस्तानविरोधातील दुसऱ्या कसोटीतील हे शतक केनच्या कसोटी कारकिर्दीतील 24 वं शतक ठरलं आहे. वेस्ट इंडिजविरोधात डिसेंबर 2020 मधील पहिल्या कसोटी सामन्यात केनने 251 धावा केल्या होत्या. त्यानंतर केनने पाकिस्तानविरोधातील पहिल्या कसोटीत 129 धावा केल्या होत्या. (new zealand vs pakistan 2nd test match new zealand captain Kane Williamson scored hundred)

केनने अर्धशतक लगावण्यासाठी खूप वेळ घेतला. मात्र अर्धशतकानंतर केनने 35 चेंडूत 50 धावा जोडल्या. तसेच केनने हेनरी निकोल्ससह चौथ्या विकेटसाठी दुसऱ्या दिवसखेर 215 धावांची नाबाद भागीदारी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडची 286-3 (85 Ov) अशी धावसंख्या होती. केन 112 तर निकोल्स 89 नाबाद आहेत. पाकिस्तानचा पहिला डाव 297 धावांवर आटोपला. त्यानंतर केन आणि निकोल्सच्या दमदार भागीदारीमुळे न्यूझीलंड मजबूत स्थितीत आहे. न्यूझीलंड दुसऱ्या दिवसखेर 11 धावांनी मागे आहे.

त्याआधी फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडची आश्वासक सुरुवात झाली. टॉम लॅथम आणि टॉन ब्लनडेलने अर्धशतकी सलामी भागीदारी केली. न्यूझीलंडला 52 धावांवर ब्लंडेलच्या रुपात पहिला धक्का बसला. या मागोमाग लॅथमने विकेट टाकली. लॅथमने 33 धावा केल्या. यानंतर केन विल्यमन्सन आणि अनुभवी रॉस टेलरने तिसऱ्या विकेटसाठी 19 धावा जोडल्या. टेलर 12 धावा करुन माघारी परतला. मात्र यानंतर चौथ्या विकेटसाठी केन आणि निकोल्सने न्यूझीलंडचा डाव सावरला. न्यूझीलंडला चांगल्या स्थितीत आणले.

निकोल्सला जीवनदान

निकोल्सला पाकिस्तानच्या चुकीमुळे जीवनदान मिळाले. निकोल्स 3 धावांवर खेळत होता. शाहीन अफ्रिदीच्या गोलंदाजीवर विकेटकीपर मोहम्मद रिजवानच्या हाती कॅच दिला. मात्र हा चेंडू नो बोल होता. यामुळे निकोल्सला जीवनदान मिळाले. या संधीचा निकोल्सने चांगलाच फायदा घेतला.

निकोल्सने दमदार अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर पाकिस्तानचे गोलंदाज न्यूझीलंडच्या फलंदाजांना बाद करण्यास अपयशी ठरले. दिवसखेर निकोल्स आणि केन या जोडीने चौथ्या विकेटसाठी 337 चेंडूत नाबाद 215 धावांची भागीदारी केली.

संबंधित बातम्या :

Pakistan Tour New Zealand | न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या 6 खेळाडू्ंना कोरोनाची लागण

(new zealand vs pakistan 2nd test match new zealand captain Kane Williamson scored hundred)