Pakistan Tour New Zealand | न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या 6 खेळाडू्ंना कोरोनाची लागण

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे.

Pakistan Tour New Zealand | न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या 6 खेळाडू्ंना कोरोनाची लागण
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 12:39 PM

वेलिंग्टन : पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर (Pakistan Tour New Zealand) आहे. पाकिस्तानचा संघ मंगळवारी न्यूझीलंडमध्ये पोहचला. पाकिस्तानच्या एकूण 49 जणांपैकी 6 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या 6 खेळाडूंमध्ये कोरोनाची लक्षणं होती, अशी धक्कादायक माहिती न्यूझीलंडच्या डॉक्टरांनी दिली. सहा खेळाडू पॉझिटव्ह आल्याने त्यांना खबरदारी म्हणून ख्राईस्टचर्च येथे क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोरोनाची लागण झालेल्या 6 खेळाडूंची नावं ही गुप्त ठेवण्यात आली आहेत. एकूण 6 पैकी 2 खेळाडूंचा कोरोना अहवाल याआधीही पॉझिटिव्ह आला होता, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (New Zealand) दिली. पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर निघण्यापूर्वी फखर जमानला कोरोनाची काही लक्षणं जाणवत होती. त्यामुळे फखरला या दौऱ्यातून वगळलं गेलं. pakistan tour new zealand 6 Pakistani cricketers tested corona positive

पाकिस्तानचा खोटेपणा उघड

पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी निघण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी लाहोरमध्ये करण्यात आली. या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा कोरोना अहवाल निगेटिव्ह होता. तसेच सर्व खेळाडू फिट असल्याचं सांगून न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी PCB (Pakistan Cricket Board) ने दिली. दरम्यान न्यूझीलंडमध्ये पोहचल्यानंतर या सर्वांची पुन्हा चाचणी करण्यात आली. यामध्ये पाकिस्तानचा खोटेपणा उघड झाला.

सराव करता येणार की नाही?

पाकिस्तानचे 6 खेळाडू पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या गोटात भितीचं वातावरण आहे. दरम्यान पाकिस्तान संघाला नेट्समध्ये सराव करता येणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. पॉझिटिव्ह 6 खेळाडूंचा अपवाद वगळता इतर सर्व खेळाडूंना सराव करता येणार आहे. मात्र त्यांना सर्व नियमांचे पालन करुनच सराव करता येणार आहे.

पाकच्या खेळाडूंकडून नियमांचं उल्लंघन

“6 खेळाडू पॉझिटिव्ह आल्यानंतरही पाकिस्तानच्या खेळाडूंनी पहिल्याचं दिवशी कोरोना नियमांच उल्लंघन केल्याची माहिती”, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिली. “आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करु. पाकिस्तानच्या खेळाडूंचं आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. आम्ही त्यांना आवश्यक ती सर्व मदत करु, असं आश्वासनही न्यूझीलंड बोर्डाकडून देण्यात आलं.

असा आहे पाकिस्तानचा न्यूझीलंड दौरा

पाकिस्तान या दौऱ्यात न्यूझीलंडविरुद्ध 3 टी 20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 20 डिसेंबरपासून होणार आहे. कोरोनानंतरचा पाकिस्तानचा हा दुसरा दौरा आहे. याआधी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यामध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा कसोटी मालिकेत  0-1 असा पराभव केला. तर पाकिस्तना टी 20 मालिका बरोबरीत सोडवण्यात यश आलं. 2 टी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान आणि इंग्लंडन प्रत्येकी 1 सामना जिंकला होता.

संबंधित बातम्या :

Chetan Chauhan Dies | माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचे निधन

pakistan tour new zealand 6 Pakistani cricketers tested corona positive

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.