AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chetan Chauhan Dies | माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचे निधन

चेतन चौहान यांनी 40 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे ते सर्वात दीर्घकाळ सलामीचे जोडीदार होते.

Chetan Chauhan Dies | माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचे निधन
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Aug 16, 2020 | 6:37 PM
Share

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचे निधन झाले. कोरोनाच्या संसर्गानंतर गुरुग्राममधील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Former Indian cricketer and UP Minister Chetan Chauhan passes away after tested Corona Positive )

चेतन चौहान हे उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अवयव निकामी झाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अविस्मरणीय क्रिकेट कारकीर्द

चेतन चौहान यांनी 40 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे ते सर्वात दीर्घकाळ सलामीचे जोडीदार होते.

22 व्या वर्षी मुंबईविरुद्ध पदार्पण केल्यानंतर चेतन चौहान त्यांच्या पिढीतील सर्वात संयमी फलंदाज म्हणून ओळखले जात होते. सलामीवीर म्हणून त्याच्या कारकीर्दीतील सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे 1979 मध्ये ओव्हलच्या मैदानावर गावस्कर यांच्यासोबत केलेली 213 धावांची भागीदारी. त्यावेळी त्यांनी 80 धावांचे योगदान दिले होते.

40 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त चेतन चौहान यांनी 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी दोन्ही स्वरुपात अनुक्रमे 2084 आणि 153 धावा केल्या. एकही शतक न करता कसोटीत दोन हजार धावा पूर्ण करणारे ते पहिले फलंदाज ठरले होते. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यात चेतन चौहान यांनी भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून काम केले. तर दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये (डीडीसीए) अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि मुख्य सिलेक्टर अशी विविध पदे त्यांनी भूषवली. (Former Indian cricketer and UP Minister Chetan Chauhan passes away after tested Corona Positive)

चेतन चौहान हे 1991 आणि 1998 मध्ये उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथून दोनदा लोकसभेवर निवडून गेले होते. ऑगस्ट 2018 पासून ते उत्तर प्रदेशचे युवा आणि क्रीडा मंत्री होते.

(Former Indian cricketer and UP Minister Chetan Chauhan passes away after tested Corona Positive)

Follow Us
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...