IPL 2025 : या आयपीएल संघाच्या मालकाचे थेट मोहम्मद अली जिनाशी कनेक्शन; मग पाकिस्तानात का नाही गेले हे कुटुंब?

IPL 2025 Matches : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव निवळा असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकड्यांना सज्जड दम भरला आहे. तर या आयपीएल संघाच्या मालकाचे थेट मोहम्मद अली जिनाशी कनेक्शन आहे. कोण आहे ती व्यक्ती, तुम्हाला माहिती आहे का?

IPL 2025 : या आयपीएल संघाच्या मालकाचे थेट मोहम्मद अली जिनाशी कनेक्शन; मग पाकिस्तानात का नाही गेले हे कुटुंब?
मोहम्मद अली जिना, आयपीएल 2025
Image Credit source: गुगल
| Updated on: May 13, 2025 | 8:24 AM

Pakistan Mohammad Ali Jinnah : 1947 पूर्वी पाकिस्तान, बांग्लादेश हा भारताचाच भाग होता. मोहम्मद अली जिना हा कपटी आणि कारस्थानी राजकारणी होता. त्याच्यामुळेच भारत पाकिस्तानचे मुस्लिम धर्माच्या आधारावर विभाजन झाले. जिना अत्यंत पाताळयंत्री होता. त्याने मुसलमानांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. त्याने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली. विशेष म्हणजे जिना हा मूळ हिंदूच होता. त्याच्या वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. तो पाकिस्तानचा पहिला गव्हर्नर जनरल होता. त्याला पाकिस्तानमध्ये कायदे आजम आणि बाबा -ए-कौम(राष्ट्रपिता) या नावाने ओळखले जाते. या आयपीएल संघाच्या मालकाचे थेट मोहम्मद अली जिनाशी कनेक्शन आहे. कोण आहे ती व्यक्ती, तुम्हाला माहिती आहे का?

या आयपीएल संघ मालकाचे आणि जिना याचे रक्ताचे संबंध

पंजाब किंग्स हा संघ पहिल्या हंगामापासून आयपीएलचा भाग आहे. उद्योगपती नेस वाडिया हा पण या संघाचे सह मालक आहेत. वाडिया भारताच्या विभाजनासाठी सर्वात मोठे कारण मोहम्मद अली जिनाचे नातेवाईक आहे. जिना याचे पहिले लग्न इमीबाई हिच्याशी झाले होते. तर दुसरे लग्न रतनबाई हिच्याशी झाले होते. या नात्यातून त्यांना एक मुल झाले होते. त्याची मुलगी दिना जिना हिचा जन्म 1919 मध्ये झाला होता. दुसरी पत्नी रतनबाई ही तिची आई आहे. 1938 मध्ये दिना हिचे मुंबईतील उद्योगपती नेविल वाडिया यांच्याशी लग्न झाले होते. नेविल पारसी होते. त्यामुळे हे लग्न जिना याला मान्य नव्हते. तो या लग्नात सुद्धा हजर नव्हता. अर्थात त्यानंतर दोघांचे संबंध चांगले होते. जिना याने मुलगी दिना हिला पाकिस्तानला बोलावले. पण तिने पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतला.

नेस वाडिया

नेस वाडिया हा दिनाचा नातू

नेस वाडियाच्या वडिलांचे नाव नुस्ली वाडिया आहे. नुस्ली हे नेविल आणि दिना यांचे पुत्र आहेत. म्हणजे नेस वाडिया हे मोहम्मद अली जिना यांच्या मुलीचा नातू आहे. नेस यांचा जन्म 1971 मध्ये भारतात झाला होता. नेस नुस्ली वाडिया बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉरपोरेशनचे संचालक आहेत. त्यांच्याकडे ब्रिटानिया इंडस्ट्रीजसह वाडिया समूहाच्या विविध सहायक कंपन्यांमध्ये वाटा आहे. 2017 मध्ये न्यूयॉर्क येथे 98 वर्षी दिना यांचा मृत्यू झाला. दिना या भारतीय नागरीक होत्या.

पंजाब किंग्समध्ये 23 टक्क्यांचा वाटा

नेस यांचे वडील नुस्ली वाडिया यांची एकूण संपत्ती 5.6 अब्ज डॉलर (जवळपास 47837 कोटी रुपये) आहे. पंजाब किंग्समध्ये मोहित बर्मन याचा सर्वात मोठा वाटा म्हणजे 48 टक्के इतका आहे. ते डाबर कंपनीचे मालक आहेत. नेस वाडिया आणि प्रीती झिंटा या दोघांची प्रत्येकी 23 टक्के वाटा आहे. आयपीएल सामन्यादरम्यान वाडिया यांना स्टेडियममध्ये अनेकदा पाहण्यात आले आहे.