मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक, मोठ्या घडामोडींना वेग

| Updated on: Sep 16, 2022 | 3:18 PM

सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये मोठ्या घडामोडींना वेग आलाय.

मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक, मोठ्या घडामोडींना वेग
MCA
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदासाठी 28 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. एमसीए (Mumbai Cricket Association) निवडणुकीवर गेल्या काही दशकांपासून शरद पवार यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीआधी विविध पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. यापूर्वी देखील यासंदर्भात वृत्त आलं होतं. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचाही समावेश होता.

मोठ्या घडामोडींना वेग

या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एकमेकांना मदत करत असल्याचं याआधीही दिसून आलं होतं. शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यातील राजकीय संबंध सर्वांना माहिती आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये मोठ्या घडामोडींना वेग आलाय.

MCA कार्यकारिणी निवडणुकीसाठी पवार महाडदळकर पॅनलची घोषणा

  • पवार महाडदळकर गट
  • अध्यक्ष – संदिप पाटील
  • उपाध्यक्ष – नवीन शेट्टी
  • सचिव – अजिंक्य नाईक
  • जे.टी. सचिव – गौरव
    पय्याडे
  • कोषाध्यक्ष – जगदीश आचरेकर

सर्वोच्च परिषद सदस्य –

1. अभय हडप
2. कौशिक गोडबोले
3. संदीप विचारे
4. प्रशांत सावंत
5. सुरेंद्र हरमलकर
6. विघ्नेश कदम
7. दाऊद पटेल
8. सुरेंद्र शेवाळे
9. राजेश महंत

आशिष शेलार हेसुद्धा आता MCA निवडणूक लढवू शकतात. ते MCA निवडणुकीच्या रिंगणात दिसू शकतात.