रस्त्यावर भाजी विकणारा तरुण Asian Games, World Cup मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार, तिरंदाज नीरज चौहानच्या मेहनतीचं फळ

| Updated on: Mar 29, 2022 | 3:23 PM

नीरज रविवारी हरियाणाच्या सोनीपत येथे 24 ते 30 मार्च दरम्यान सुरू असलेल्या तिरंदाजीच्या चाचणीत पात्र ठरला. चाचण्यांमध्ये दुसरे स्थान पटकावून नीरजने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.

रस्त्यावर भाजी विकणारा तरुण Asian Games, World Cup मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार, तिरंदाज नीरज चौहानच्या मेहनतीचं फळ
Neeraj Chauhan
Image Credit source: Twitter / @TribalAffairsIn
Follow us on

लखनौ : हालाकीच्या परिस्थितीवर, शारिरीक व्यंगावर, असाध्य रोगावर मात करुन आपलं ध्येय गाठणाऱ्या अनेक व्यक्ती आपण पाहिल्या आहेत. या व्यक्ती अनेकांना आपल्या कृतीतून जगाला मार्गदर्शन करत असतात. गेल्या दोन वर्षांत कोरोना या साथरोगाने अनेक कुटुंबं उध्वस्त केली. अनेक कुटुंबांचा आर्थिक कणा मोडला. परंतु यावरही काहींनी मात केली. उत्तर प्रदेशमधल्या मेरठचा युवा तिरंदाज नीरज चौहानचं (Neeraj Chauhan) कुटुंब कोरोना काळात रस्त्यावर आलं. मात्र त्या परिस्थितीवर मात करत नीरजने आपलं कुटुंब तर साभाळलंच, सोबत त्याने आपल्या ध्येयाच्या दिशेने सुरु असलेला प्रवास न थांबवता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीची पात्रता फेरी पूर्ण केली आहे. नीरज आता आता आशियाई क्रीडा स्पर्धेत (2022 Asian Games) भारताचं प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. नीरज चौहानची आशियाई स्पर्धा, तिरंदाजी विश्वचषक (Archery World Cup) आणि जागतिक खेळांमध्ये निवड झाली आहे.

नीरज रविवारी हरियाणाच्या सोनीपत येथे 24 ते 30 मार्च दरम्यान सुरू असलेल्या तिरंदाजीच्या चाचणीत पात्र ठरला. चाचण्यांमध्ये दुसरे स्थान पटकावून नीरजने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे. मूळचे गोरखपूरचे असलेले नीरज चौहानचे वडील अक्षयलाल हे मेरठमधील कैलाश प्रकाश स्टेडियममध्ये स्वयंपाकी (Cook) आहेत. या स्टेडियममध्ये नीरजने तिरंदाजीचा सराव सुरू ठेवला. पण, कोरोनाच्या काळात वडिलांची नोकरी गेली आणि जगणे कठीण झाले. अशा परिस्थितीतही नीरज मागे हटला नाही. त्याने कोरोना काळात मिळेल ती कामं करुन कुटुंबाच्या पालनपोषणासाठी वडील आणि भावासोबत मेहनत केली. या काळात त्याने त्याच्या तिरंदाजीवरील लक्ष विचलित होऊ दिलं नाही.

कोरोनाच्या काळात भाजीपाल्याची गाडी लावली

नीरजचा मोठा भाऊ सुनील चौहान बॉक्सर आहे. दोन्ही भावांनी मिळून कोरोनाच्या काळात भाजीपाल्याची गाडी लावून कुटुंब चालवले. त्यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर माजी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी दोन्ही खेळाडूंना आर्थिक मदत केली होती. त्यानंतर नीरजची स्पोर्ट्स कोट्यातून ITBP मध्ये निवड झाली. आता पुन्हा एकदा मुलगा आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार हा नीरज आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. नीरजचे वडील अक्षयलाल देखील मुलाच्या या यशावर खूप आनंदी आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धा यंदा नोव्हेंबरमध्ये जकार्ता येथे होणार आहेत. नीरज त्यात सहभागी होणार आहे. त्याचवेळी, एप्रिलमध्ये तुर्कीतील अँटालिया येथे विश्वचषक आणि जागतिक क्रीडा स्पर्धा यूएसए येथे होणार आहेत. या तिन्ही स्पर्धांमध्ये नीरज भारताचं तिरंदाजीत प्रतिनिधीत्व करणार आहे.

इतर बातम्या

Lakshya Sen : घरातूनच बॅडमिंटनचा वारसा, एकाच सामन्यात प्रकाश पदुकोण बनले जबरा फॅन, कसा होता लक्ष्यचा प्रेरणादायी प्रवास?

ड्रग्स बाळगल्याप्रकरणी 4 वर्ष मुंबईच्या तुरुंगात खितपत पडलेला टेबल टेनिसपटू निर्दोष, न्यायालयाकडून सुटकेचे आदेश

Ashleigh Barty Retires: ‘नंबर 1 रहाण्यासाठी आता मी….’ अ‍ॅशली बार्टीने प्रामाणिकपणे सांगितलं निवृत्तीमागचं खरं कारण