
Australian Open 2026 Final: ऑस्ट्रेलियन ओपन 2026 च्या पुरूष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस अल्कारेजने इतिहास रचला. त्याने अंतिम फेरीत दिग्गज आणि वर्ल्ड नंबर 1 टेनिसपटू नोवाक जोकोविचला पराभवाची धूळ चारली. ही स्पर्धा चौथ्या सेटपर्यंत चालली. पहिल्या पहिल्या सेटमध्ये नोवाक जोकोविचने बाजी मारली. मात्र त्यानंतर सलग तीन सेटमधघ्ये कार्लोस अल्काराज सरस ठरला. हा सामना अल्कारेजने 3-1 ने जिंकला. अल्कारेजने 2-6, 6-2, 6-3, 7-5 ने नोवाक जोकिवचला पराभवाची धूळ चारली. कार्लोस अल्कारेजने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन किताब जिंकला आणि कॅरियर ग्रँड स्लॅम पूर्ण केलं. जेव्हा एखादा खेळाडू त्याच्या कारकिर्दीत चारही प्रमुख स्पर्धा जिंकतो तेव्हा त्याला करिअर स्लॅम म्हणतात.
कार्लोस अल्कारेजचा हा सातवा ग्रँड स्लॅम किताब आहे. अल्कारेजने वयाच्या 22 व्या वर्षीत ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबलडन आणि यूएस ओपन किताब जिंकला आहे. त्याने 2023 आणि 2024 मध्ये विंबलडन, 2024 आणि 2025 मध्ये फ्रेंच ओपन, 2022 मध्ये यूएस ओपन आणि 2026 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकला आहे. अशी कामगिरी सर्वात लहान वयातील पुरूष टेनिसपटू ठरला आहे. त्याने 22 वर्षे आणि 272 दिवसांचा असताना करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण केलं आहे.अल्कराजने 88 वर्षानंतर डॉन बजचा विक्रम मोडला आहे. त्यांनी 22 वर्षे आणि 363 दिवसांच्या वयात करिअर स्लॅम मिळवला होता. कार्लोस अल्कारेज, डॉन बज, रॉड लेव्हर, रॉय एमर्सन, आंद्रे अगासी, रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांनी करिअर स्लॅम पूर्ण केले आहेत.
History 🏆
Career slam complete, take a bow @carlosalcaraz 🇪🇸@wwos • @espn • @tntsports • @wowowtennis • #AO26 pic.twitter.com/pd7ye35TTq
— #AusOpen (@AustralianOpen) February 1, 2026
कार्लोस अल्कारेजला ऑस्ट्रेलियन ओपन विजयानंतर बक्षिसाच्या रूपाने मोठी रक्कम मिळाली आहे. त्याला बक्षीस म्हणून 2.75 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 25 कोटी 21 लाख रूपये मिळाले आहेत. ही ऑस्ट्रेलियन ओपन इतिहासातील सर्वात मोठी बक्षिसी रक्कम आहे. तर नोवाक जोकोविचला उपविजेता म्हणून जवळपास 13 कोटी रूपये मिळाले आहेत.