FIFA World Cup 2026: एम्बाप्पेने केली मेस्सीसारखी कामगिरी, उपांत्य फेरी गाठणारा फ्रान्स पहिला संघ
France vs Morocco: उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फ्रान्स आणि मोरोक्को हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात फ्रान्सने मोरोक्कोचा पराभव केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. या विजयात किलियन एम्बाप्पेची मोठी भूमिका होती.

France vs Morocco: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्स आणि मोरोक्को या संघात लढत झाली. या सामन्यात फ्रान्सने मोरोक्कोचा 2-0 ने धुव्वा उडवला. यासह स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे. फ्रान्सच्या विजयात किलियन एम्बाप्पेचा मोलाचा हातभार लागला. एम्बाप्पेने उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोविरुद्ध केलेल्या कामगिरीची तुलना मेस्सीसोबत केली जात आहे. राउंड 16 मध्ये इजिप्तविरुद्धच्या सामन्यात अर्जेंटीनाचा स्टार लियोनल मेस्सीने केलेल्या कामगिरीसोबत बरोबरी केली जात आहे. दोघांनी पेनल्टी गमावल्यानंतर गोल मारला आणि संघाला पुढच्या फेरीत पोहोचवलं. फ्रान्सने फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोला पराभूत करून 100 टक्के विजयी टक्केवारी कायम ठेवली आहे. फ्रान्सने सहा सामन्यात 16 मारत उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास गाठला आहे.
फ्रान्सचे सहा सामन्यात 16 गोल
फ्रान्सने सेनेगल आणि इराणविरुद्ध प्रत्येकी 3 गोल मारले आहे. 16 जूनला सेनेगलविरुद्धचा 3-1 ने जिंकला, तर 22 जूनला इराणला 3-0 ने मात दिली. त्यानंतर नॉर्वेविरुद्ध 4 गोल मारत त्यांना 4-1 पराभवाची धूळ चारली. राउंड ऑफ 32 मध्ये स्वीडनविरुद्ध 3 गोल मारले आणि हा सामना 3-0 ने जिंकला. राउंड ऑफ 16 मध्ये पॅराग्वेशी लढत झाली. हा सामना फ्रान्सने 1-0 ने जिंकला. आता उपांत्यपूर्व पेरीत मोरोक्कोला 2-0 ने पराभूत केलं. यासह सहा सामन्यात फ्रान्सने 16 गोल मारले.
WATCH: The sequence showing how Mbappe seemed to have been distracted by the ref’s on-and-off orders before he kicked the penalty. #GalaxyS26Ultra https://t.co/3cmGXdQ4QD pic.twitter.com/WK0BaRuHf7
— Gary Al-Smith (@garyalsmith) July 9, 2026
28व्या मिनिटाला एम्बाप्पेची मेस्सीसारखी चूक
फ्रान्सने मोरोक्कोविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल मारले. पहिला हाफ गोलरहित राहिला. पण पहिल्या हाफच्या 28व्या मिनिटाला फ्रान्सला आघाडी मिळाली असती. पण एम्बाप्पेने मेस्सीसारखी चूक केली आणि गोल चुकला. मेस्सीने राउंड ऑफ 16 मध्ये इजिप्तविरुद्ध अशीच पेनल्टी चुकवली होती. आता उपांत्यपूर्व फेरीत एम्बाप्पेने चूक केली. दुसरा हाफ सुरू झाल्यानंतर 15व्या मिनिटानंतर एम्बाप्पेने गोल मारला. इजिप्तविरुद्ध मेस्सीनेही पेनल्टी चुकवल्यानंतर गोल मारला होता.
पहिला गोल मारल्यानंतर एम्बाप्पेने अवघ्या सहा मिनिटानंतर एक जबरदस्त असिस्ट केलं. त्यावर देम्बेलेने मोरोक्कोविरुद्ध दुसरा गोल मारला. त्यामुळे फ्रान्सला 2-0 ने आघाडी मिळाली. ही आघाडी मोरोक्कोला शेवटपर्यंत मोडता आली नाही आणि फ्रान्सचा विजय झाला.