BIG BREAKING | खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर अखेर गुन्हा दाखल

खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झालाय. महिला कुस्तीपटुंच्या आरोपानंतर राजधानी दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BIG BREAKING | खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर अखेर गुन्हा दाखल
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 11:44 PM

नवी दिल्ली : खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झालाय. महिला कुस्तीपटुंच्या आरोपानंतर राजधानी दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. अनेक दिवसांपासून हे प्रकरण तापलं आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंचे गेल्या आठवड्याभरापासून जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणात कुस्तीपटूंना दिग्गज आजी-माजी खेळाडूंचा पाठिंबा मिळतोय. त्यामुळे हा विषय सोशल मीडियावरही गाजतोय. हे कुस्तीपटू गेल्या अनेक दिवसांपासून जंतरमंतर इथे सामूहिक उपोषणाला बसले आहेत.

बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शौषण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या उपोषणात दिग्गज खेळाडू सहभागी झाले आहेत. बृजभूषण सिंह विरोधात एफआयआर दाखल करण्यात यावी, अशी मागणी या उपोषणकर्त्यांची आहे. या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून हे उपोषण सुरु आहे. अखेर या मागणीला यश आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर अखेर आता बृजभूषण सिंह याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय.

कुस्तीपटूंचं जानेवारी महिन्यापासून धरणे आंदोलन

हे कुस्तीपटू 3 महिन्यांपूर्वी जानेवारी महिन्यात धरणे आंदोलनाला बसलेले. बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आरोप करत जानेवारी महिन्यात कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र अध्यक्षांविरोधात अजूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे भारतीय कुस्तीपटू पुन्हा एकदा रविवारपासून आंदोलनाला बसले. तसेच दिल्ली पोलीस बृजभूषण सिंह विरोधात कारवाई करत नसल्याने काही दिवसांपूर्वी 24 एप्रिल रोजी विनेश फोगट आणि इतर कुस्तीपटूंनी न्यालयात धाव घेतली. बृजभूषण सिंह विरोधात एफआयआर नोंदवून घेण्यासाठी कुस्तीपटूंनी न्यायालयात धाव घेतली.

हे सुद्धा वाचा

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी पार पडली. दिल्ली पोलिसांनी तक्रार नोंदवल्यानंतरही एफआयआर दाखल केलं नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायलयाने दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले. तसेच पोलिसांना गुन्हा नोंद करुन घेण्याबाबत आदेश दिले. ज्येष्ठ आणि अनुभवी वकील कपिल सिब्बल यांनी कुस्तीपटूंची बाजू न्यायालयात मांडली.

सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू स्पष्ट केली. बृजभूषण सिंह यांना अटक करण्याची मागणी कुस्तीपटूंकडून करण्यात आली आहे. एफआयआरसाठी 6 दिवस वेळकाढूपणा करण्यात आला. त्यामुळे आामचा आता दिल्ली पोलिसांवर फार विश्वास नसल्याचं कुस्तीपटू म्हणाले. तसेच बृजभूषण सिंह यांची कोठडीत रवानगी होत नाही, तोवर आमचं उपोषण सुरुच राहिल, अशी भूमिकाही कुस्तीपटूंनी घेतली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.