Fifa World Cup 2026: नेमारनंतर आणखी एका फुटबॉलपटूची निवृत्ती, रोनाल्डोचाही शेवटचा वर्ल्डकप

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा बाद फेरी अर्थात शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. राउंड ऑफ 16 मध्ये बऱ्यात उलथापालथी पाहायला मिळत आहे. ब्राझीलचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर दिग्गज फुटबॉलपटू नेमारने निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आणखी एका फुटबॉलपटूने रामराम ठोकला आहे.

| Updated on: Jul 06, 2026 | 3:12 PM
1 / 5
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत राउंड ऑफ 16 म्हणजेच उप उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत. या फेरीत धक्कादायक निकाल लागला आहे. पाच वेळा जेतेपद मिळवलेला ब्राझील संघ स्पर्धेतून आऊट झाला आहे. त्यानंतर फुटबॉलपटू नेमारने निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता मेक्सिकन गोलकीपर गुइलेर्मो ओचोआनेही कारकि‍र्दीला पूर्णविराम लावला आहे.  (Photo: Getty Images)

2 / 5
राउंड ऑफ 16 मध्ये इंग्लंड आणि मेक्सिको यांच्यात लढत झाली. या सामन्यात इंग्लंडने मेक्सिकोला 3-2 ने पराभूत केलं. या पराभवानंतर मेक्सिकन गोलरक्षक गुइलेर्मो ओचोआ याने निवृत्ती जाहीर. हा निर्णय घेताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. दुसरीकडे, मायदेशात विश्वचषक जिंकण्याचं मेक्सिकोचं स्वप्नही भंगलं.  (Photo: Getty Images)

3 / 5
40 वर्षीय गुइलेर्मो ओचोआ मेक्सिकन संघांच जवळपास दोन दशक प्रतिनिधित्व केलं. त्याने सहा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेतला. आता त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघातून निवृत्ती घेतली आहे.  (Photo: Getty Images)

4 / 5
राउंड ऑफ 16 मध्ये नॉर्वेने ब्राझीलला 2-1 ने पराभूत केलं. या पराभवानंतर फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्का बसला. कारण या सामन्यानंतर फुटबॉलपटू नेमारने निवृत्ती जाहीर केली. नेमार 16 वर्षे ब्राझील संघासाठी खेळला.  (Photo: Getty Images)

5 / 5
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत फुटबॉल चाहत्यांना आणखी एक धक्का बसला आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. राउंड ऑफ 16 मध्ये स्पेन विरूद्धच्या सामन्यापूर्वीच त्याने ही घोषणा केली आहे.  (Photo: Getty Images)

Follow Us