Team India : टीम इंडियाची घोषणा, 18 खेळाडूंना संधी, हार्दिकचा समावेश, कॅप्टन कोण?

Hockey Asia Cup 2025 : हॉकी आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. जाणून घ्या भारताचं वेळापत्रक.

Team India : टीम इंडियाची घोषणा, 18 खेळाडूंना संधी,  हार्दिकचा समावेश, कॅप्टन कोण?
India Flag
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 20, 2025 | 9:17 PM

बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मंगळवारी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादव याच्याकडे भारतीय संघाची धुरा आहे. तर शुबमन गिल उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. त्यानंतर आता 20 ऑगस्ट रोजी आगामी आशिया कप स्पर्धेसाठी हॉकी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय हॉकी संघात 18 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

हॉकी आशिया कप स्पर्धेला 29 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 7 सप्टेंबरला या स्पर्धेची सांगता होईल. या स्पर्धेतील सामने हे राजगीर हॉकी स्टेडियममध्ये होणार आहेत. हॉकी टीम इंडियाचा या स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतासह या ग्रुपमध्ये चीन, जपान आणि कझाकिस्तानच्या हॉकी संघाचा समावेश आहे.

भारताचा पहिला सामना केव्हा?

भारतीय संघ आशिया कप स्पर्धेतील आपला पहिला सामना हा 29 ऑगस्टला खेळणार आहे. भारतासमोर या सामन्यात चीनचं आव्हान असणार आहे. दुसरा सामना हा 31 ऑगस्टला होणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध जपान यांच्यात लढत होणार आहे. तर भारतीय संघाचा साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना हा 1 सप्टेंबरला कझाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत सिंह या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार आहे.

भारतीय संघात या स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. चाहत्यांना आपल्या खेळाडूंकडून या स्पर्धेत चमकदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

कृष्णा बी पाठक आणि सूरज करकेरा या दोघांना गोलकीपर म्हणून संधी देण्यात आली आहे. हरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, जरमनप्रीत सिंह, सुमित, संजय आणि जुगराज सिंह यांच्यावर डिफेन्सची जबाबदारी असणार आहे.

भारतीय संघ आशिया कपसाठी सज्ज

मिडफिल्डर म्हणून मनप्रीत सिंह, विवेक सागर प्रसाद, राजिंदर सिंह, राजकुमार पाल आणि हार्दिक सिंह यांना संधी दिली गेली आहे. तसेच फॉरवर्ड अटॅकची जबाबदारी अभिषेक, मनदीप सिंह, शिलानंद लाकडा आणि दिलप्रीत सिंह यांच्यावर आहे.

हॉकी आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत सिंह (कॅप्टन), कृष्ण बी पाठक (गोलकीपर), सूरज करकेरा (गोलकीपर), सुमित, जरमनप्रीत सिंह, संजय, हरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, जुगराज सिंह, राजिंदर सिंह, राज कुमार पाल, हार्दिक सिंह, मनप्रीत सिंह, विवेक सागर प्रसाद, मनदीप सिंह, शिलानंद लाकडा, अभिषेक, सुखजीत सिंह आणि दिलप्रीत सिंह.