PHOTO: गोल्डन बॉय नीरज चोप्राचा रॉयल लूक, पारंपरिक वेशभूषेत खास फोटोशूट

| Updated on: Oct 05, 2021 | 3:37 PM

भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्रा कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता तो एका धांसू फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

1 / 5
ऑगस्ट महिन्यात 7 तारखेला टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देत भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) इतिहास रचला होता. आता या गोष्टीला घडून जवळपास दोन महिने लोटले. पण अजूनही नीरजची हवा कमी झालेली नाही. नीरजचे चाहते देशभरात आहेत. त्यात नीरजही आजकाल सोशल मीडियावर अॅक्टिव होऊ लागल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.(फोटो सौैजन्य- नीरज चोप्रा इन्स्टाग्राम)

2 / 5
दरम्यान नीरजने त्याच्या याच चाहत्यांसाठी एक खास फोटोशूट केलं आहे. नीरजने एथनिक वेअर अर्थात भारतीय पद्धतीचे कुर्ता, शेरवाणी अशा प्रकारचे कपडे घालून एक खास फोटोशूट केलं आहे. त्याने हे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामलाही पोस्ट केले आहेत. (फोटो सौैजन्य- नीरज चोप्रा इन्स्टाग्राम)

3 / 5
नीरजने या फोटोंना शेअर करताना हे कपडे रोहित बाल या डिझायनरचे असून फोटोज तरुण किहवाल याने काढल्याचा उल्लेख कॅप्शनमध्ये केला आहे.(फोटो सौैजन्य- नीरज चोप्रा इन्स्टाग्राम)

4 / 5
नीरज काही दिवसांपूर्वी CRED कंपनीच्या एका जाहिरातीत अप्रतिम अभिनय करुन सर्वांची मनं जिंकलेला नीरज कोन बनेगा करोडपती (KBC13) शोमध्येही झळकला होता. त्यानंतर तो डान्स रिअॅलिटी शो डान्स+6 (Dance+ 6) मध्ये देखील झळकला असून त्याचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले होते.(फोटो सौैजन्य- नीरज चोप्रा इन्स्टाग्राम)

5 / 5
ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत नीरजने सुरुवातच धडाकेबाज केली. त्याने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या वेळी त्याने 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. तिसऱ्या थ्रोमध्ये 76.79 मीटर थ्रो फेकला तरी अद्यारपही त्याची आघाडी कायम होती. त्यानंतर त्याचा चौथा आणि पाचवा थ्रो फाऊल ठरला. पण त्याने सहाव्या प्रयत्नाआधीत सुवर्णपदक खिशात घातलं होतं.  (फोटो सौैजन्य- नीरज चोप्रा इन्स्टाग्राम)