टेनिस स्टार सानिया मिर्झा किती संपत्तीची मालकीण, पहा किती आहे नेटवर्थ

सानिया मिर्झा हीने अगदी कमी वयात टेनिसमध्ये नाव कमाविले आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी सानिया जगभर ओळख मिळाली. त्यामुळे तिला 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. हा सन्मान मिळविणारी ती सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली होती. तिला खेळातून आणि जाहीरातीतून प्रचंड उत्पन्न मिळाले आहे आणि मिळत आहे.

टेनिस स्टार सानिया मिर्झा किती संपत्तीची मालकीण, पहा किती आहे नेटवर्थ
Sania mirza
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Nov 15, 2023 | 10:06 PM

मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : भारताची प्रसिद्ध टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हीची कारकीर्द खूप चांगली राहीली आहे. गेल्या काही महिन्यात आपल्या खाजगी जीवनामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिचा पती पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याच्या पासून ती वेगळी होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतू याबाबत तिने काही वक्तव्य केलेले नाही. सानियाहीने टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या 35 वर्षांत तिने अनेक मानसन्मान मिळविले आहेत. आपल्या लक्झरी लाईफबद्दलही ती कायम चर्चेत असते. सानिया प्रचंड मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.

सानिया मिर्झा हीने नाव कमविण्यासोबत संपत्ती देखील कमविली आहे. खूप छोट्या वयात तिने टेनिस खेळायला सुरुवात केली, तिने सहा ग्रॅंड स्लॅम जिंकून देशाचे नाव केले आहे.साल 2004 मध्ये तिला अर्जून पुरस्कार मिळाला. साल 2006 मध्ये पद्मश्री आणि 2015 मध्ये तिला खेल रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

सानियाने टेनिस खेळून 52 कोटी रुपये कमाई केली आहे. जाहीरातीमधून ती दरमहिन्याला कोट्यवधी रुपये कमविते. ब्रँड एंडोर्समेंटसाठी तिला 50 ते 60 लाख रुपये मिळतात. तिची संपत्ती 200 कोटी रुपये आहे. सानियाला खेळातून वार्षिक तीन कोटी रुपये आणि जाहीरातीतून 25 कोटी रुपये मिळतात. हैदराबाद येथे तिचे आलिशान घर आहे. ज्याची किंमत 13 कोटी आहे. सानियाने हे घर साल 2012 मध्ये विकत घेतले होते. सानिया टेनिक अकादमी चालविते. तिचा दुबईतील एका बेटावर आलिशान बंगला आहे.

आलीशान गाड्यांची रेंज

सानिया मिर्झा हीच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. सानियाकडे बीएमडब्ल्यू एक्स 3 आणि एक पोर्श carrera GT देखील आहे. त्याशिवाय मर्सिडीज, जग्वार एक्सई, बीएमडब्ल्यू 7 – सिरीज , ऑडी, मर्सिडीज बेंज आणि रेंज रोव्हर सारख्या गाड्या आहेत.

मुंबईत झाला जन्म

सानिया हीने हैदराबाद मधून शिक्षण घेतले आहे. एनएएसआर या शाळेतून शिक्षण आणि सेंट मेरी कॉलेजमधून ग्रॅज्यूएशनची डीग्री घेतली आहे. तिला 11 डिसेंबर 2008 रोजी चेन्नईच्या एमजीआर शैक्षणिक आणि रिसर्च इंस्टिट्यूट युनिव्हर्सिटीतून डॉक्टरेट मिळाली आहे. सानियाचा जन्म मुंबईत 1986 ला झाला आहे.