AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ख्रिस्तियानो रोनाल्डोची घरवापसी, Juventus सोडून जुन्या क्लबमध्ये परतला

जागतिक फुटबॉलमध्ये काही दिवसांपूर्वीच एक मोठा बदल पाहायला मिळाला. तब्बल 17 वर्ष, 778 सामने, 672 गोल्स आणि 35 चषक मिळवून दिल्या नंतर लिओनल मेस्सीने (Lionel Messi) बार्सिलोना संघ सोडला.

ख्रिस्तियानो रोनाल्डोची घरवापसी, Juventus सोडून जुन्या क्लबमध्ये परतला
Cristiano Ronaldo
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 27, 2021 | 10:16 PM
Share

मुंबई : जागतिक फुटबॉलमध्ये काही दिवसांपूर्वीच एक मोठा बदल पाहायला मिळाला. तब्बल 17 वर्ष, 778 सामने, 672 गोल्स आणि 35 चषक मिळवून दिल्या नंतर लिओनल मेस्सीने (Lionel Messi) बार्सिलोना संघ सोडला. मेस्सीने पीएसजी संघात जाण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे मेस्सीचा प्रतिस्पर्धी आणि फुटबॉल जगतातील दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) यानेदेखील त्याचा सध्याचा संघ युव्हेंट्स (Juventus) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (Manchester United deals to re-sign Cristiano Ronaldo from Juventus)

पोर्तुगालचा हा स्टार खेळाडू 12 वर्षानंतर त्याच्या जुन्या क्लब मँचेस्टर युनायटेडमध्ये (Manchester United) परतला आहे. क्लबनेच शुक्रवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. रोनाल्डो इटालियन क्लब युव्हेंटससोबत तीन वर्षे घालवल्यानंतर इंग्लिश प्रीमियर लीगमधील क्लबमध्ये परतला आहे. युव्हेंट्सपासून विभक्त झाल्याची बातमी आल्यानंतर रोनाल्डो मँचेस्टर सिटीमध्ये जाऊ शकतो अशी अटकळ होती पण तो मँचेस्टर युनायटेडमध्ये दाखल झाला आहे.

रोनाल्डो युव्हेंटसपूर्वी स्पेनच्या दिग्गज क्लब रियल माद्रिदकडून खेळत होता. तो 2009 मध्ये स्पॅनिश क्लबमध्ये पोहोचला आणि 2018 पर्यंत या क्लबमध्ये राहिला. त्याने या क्लबसह ला लीगची विजेतेपदंही पटकावली आहेत. माद्रिदपूर्वी रोनाल्डो इंग्लिश प्रीमियर लीगचा भाग होता. त्याने 2003 मध्ये मँचेस्टर युनायटेडसह त्याच्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि तिथूनच त्याला प्रसिद्धी मिळाली, जी पुढे जाऊन त्याने रियल माद्रिदकडून खेळताना अधिक बळकट केली. आता पुन्हा एकदा तो या क्लबसाठी खेळताना दिसणार आहे.

प्रशिक्षकाने आधीच संकेत दिले होते

युव्हेंट्सचा प्रशिक्षक मासिमिलियानो अलेग्री याने शुक्रवारी एका मुलाखतीत म्हणाला होता की, ‘रोनाल्डोने काल माझ्याशी बोलताना त्याला यापुढे युव्हेंटस संघाकडून खेळण्याची अधिक इच्छा नसल्याचे स्पष्ट केले. काही कारणांमुळे रोनाल्डो एम्पोली विरुद्धच्या सामन्यातही खेळणार नसून तो सरावासाठीही अनुपस्थित होता.

‘हे होतच असतं’

अलेग्रीने पुढे बोलताना सांगितले की, ”यामध्ये निराश होण्याची कोणतीच गोष्ट नाही. जागतिक फुटबॉलमध्ये हे घडतचं असतं. रोनाल्डोला त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. याआधी देखील जिदाने, बफॉन, सिवोरी सारखे दिग्गज खेळाडू जुव्हेंटस संघासोबत खेळले असून आपआपले योगदान देऊन गेले आहेत. हे असं होतचं असंत.”

रोनाल्डोची तिन्ही लीगमधील खेळी

स्पोर्टींग सीपी (Sporting CP) संघाकडून सुरुवातीला खेळल्यानंतर ख्रिस्तियानोला इंग्लिश प्रिमीयर लीगमधील प्रसिद्ध क्लब मँचेस्टर युनायटेडने (Manchester United) विकत घेतले होते. त्यांच्याकडून रोनाल्डोने 292 सामने खेळत 118 गोल केले. ज्यानंतर ला-लीगा अर्थात स्पेन फुटबॉल लीगमधील रिअल माद्रिदने रोनाल्डोला विकत घेतले. रिअल माद्रीदकडून (Real Madrid) रोनाल्डोने 438 सामन्यांत 450 गोल करत संघाला अनेक महत्त्वाचे किताब मिळवून दिले. त्यानंतर सध्या रोनाल्डोला सिरीज ए मधील युव्हेंटस संघाने विकत घेतले. युव्हेंटसकडून रोनाल्डोने आतापर्यंत 133 सामन्यांत 101 गोल केले आहेत. पुढील काळात रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडकडून खेळताना दिसेल.

हे ही वाचा

Lionel messi barcelona : 17 वर्षांचा प्रवास संपला, लिओनल मेस्सीचा बार्सिलोना संघाला रामराम!

दहाव्या वर्षी उपचारासाठी मदत, 20 वर्षांपासून तोच संघ, कोट्यवधींच्या ऑफर्स धुडकावल्या

(Manchester United deals to re-sign Cristiano Ronaldo from Juventus)

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...