Cristiano Ronaldo Transfer : मेस्सी पाठोपाठ रोनाल्डोही क्लब बदलण्याच्या वाटेवर, ‘या’ संघासोबत करारबद्ध होण्याची शक्यता

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: shashank patil

Updated on: Aug 27, 2021 | 7:20 PM

काही दिवसांपूर्वीच दिग्गज खेळाडू लिओनल मेस्सीने बार्सिलोना क्लब सोडत पीएसजी संघात सामिल झाला. आता त्याचा प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो देखील जुव्हेन्टस क्लब सोडण्याच्या वाटेवर आहे.

Cristiano Ronaldo Transfer : मेस्सी पाठोपाठ रोनाल्डोही क्लब बदलण्याच्या वाटेवर, 'या' संघासोबत करारबद्ध होण्याची शक्यता
ख्रिस्तियानो रोनाल्डो

मुंबई : जागतिक फुटबॉलमध्ये काही दिवसांपूर्वीच एक मोठा बदल पाहायला मिळाला. तब्बल 17 वर्ष, 778 सामने, 672 गोल्स आणि 35 चषक मिळवून दिल्या नंतर लिओनल मेस्सीने (Lionel Messi) बार्सिलोना संघ सोडला. मेस्सीने पीएसजी संघात जाण्याचा निर्णय घेतला असून दुसरीकडे मेस्सीचा प्रतिस्पर्धी आणि फुटबॉल जगतातील दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याने देखील त्याचा सध्याचा संघ जुव्हेंटस  (Juventus) सोडण्याचा निर्णय़ घेतल्याची चर्चा आहे. 

जुव्हेंटसचा प्रशिक्षक मासिमिलियानो अलेग्री याने शुक्रवारी दिलेल्या माहितीत, ‘रोनाल्जोने काल माझ्याशी बोलताना त्याला यापुढे जुव्हेंटस संघाकडून खेळण्याची अधिक इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं.’ अलेग्रीने माहिती दिली की काही कारणांमुळे रोनाल्डो एम्पोली विरुद्धच्या सामन्यातही खेळणार नसून तो सरावासाठीही अनुपस्थित होता. दरम्यान समोर येत असलेल्या माहितीनुसार रोनाल्डो इंग्लिश फुटबॉल लीगमधील मॅनचेस्टर सिटी (Manchester City) संघासोबत जोडला जाण्याची शक्यता आहे.

‘हे होतच असतं’

अलेग्रीने पुढे बोलताना सांगितले की, ”यामध्ये निराश होण्याची कोणतीच गोष्ट नाही. जागतिक फुटबॉलमध्ये हे घडतचं असतं. रोनाल्डोला त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. याआधी देखील जिदाने, बफॉन, सिवोरी सारखे दिग्गज खेळाडू जुव्हेंटस संघासोबत खेळले असून आपआपले योगदान देऊन गेले आहेत. हे असं होतचं असंत.”

रोनाल्डोची तिन्ही लीगमधील खेळी

स्पोर्टींग सीपी (Sporting CP) संघाकडून सुरुवातीला खेळल्यानंतर ख्रिस्तियानोला इंग्लिश प्रिमीयर लीगमधील प्रसिद्ध क्लब मँचेस्टर युनायटेडने (Manchester United ) विकत घेतले. त्यांच्याकडून रोनाल्डोने 292 सामने खेळत 118 गोल केले. ज्यानंतर ला-लीगा अर्थात स्पेन फुटबॉल लीगमधील रिअल माद्रिदने रोनाल्डोला विकत घेतले. रिअल माद्रीदकडून (Real Madrid) रोनाल्डोने 438 सामन्यांत 450 गोल करत संघाला अनेक महत्त्वाचे किताब मिळवून दिले. त्यानंतर सध्या रोनाल्डोला सिरीज ए मधील जुव्हेंटस संघाने विकत घेतले आहे. जुव्हेंटसकडून रोनाल्डोने 133 सामन्यांत 101 गोल आतापर्यंत केले आहेत.

हे ही वाचा

Lionel messi barcelona : 17 वर्षांचा प्रवास संपला, लिओनल मेस्सीचा बार्सिलोना संघाला रामराम!

दहाव्या वर्षी उपचारासाठी मदत, 20 वर्षांपासून तोच संघ, कोट्यवधींच्या ऑफर्स धुडकावल्या

(cristiano ronaldo transfer news ronaldo may left juventus and join manchester city soon)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI