Manu Bhaker : ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी 22 वर्षाची वाघिण मनु भाकर आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण प्रवास
मनु भाकर या नावाची देशभरात चर्चा आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्याच दिवशी पदकांचं खात उघडून दिलेलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी एक पदक जिंकत मनु भाकरने इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पकमध्ये दोन पदके जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू बनलीये. आता सर्व जगभरातून कौतुक होत असलं तरी चॅम्पियन खेळाडूचा प्रवास काही सोपा राहिलेला नाही. मनु भाकरबाबत सर्वकाही जाणून घ्या.

पॅरिस ऑलिम्पिक म्हटलं की आता मनु भाकरचं नाव घेतलं जाणार आहे. वयाच्या अवघ्या 22 वर्षी पोरीने इतिहास रचला आहे. मनु भाकरने भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकले असून अशी कामगिरी ती पहिली खेळाडू ठरली आहे. एकाच खेळाडूने दोन ऑलिम्पिक जिंकलेत यामध्ये पी.व्ही. सिंधू आणि सुशील कुमार यांचा समावेश आहे. पण मनुने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळवलेत. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र आणि 10 मीटर एअर पिस्तूल महिला यामध्ये मनुने कौतुकास्द कामगिरी करत कांस्यदकाटी कमाई केली आहे. मनु भाकरचे सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे. मात्र यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याआधीचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. मनु...
