पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत गडबड! ‘पुरुष’ बॉक्सरची महिलेशी झाली स्पर्धा, 46 सेकंदातच संपला सामना

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आणखी एका वादाला तोंड फुटलं आहे. महिलांच्या वेल्टरवेट कॅटगरीत रंगलेल्या एका स्पर्धेमुळे नवा वाद समोर आला आहे. इटलीच्या अँजेला कारिनी आणि अल्जेरियाची बॉक्सर इमान खेलीप यांच्यात सामना रंगला. पण हा सामना 46 सेकंदातच सोडला. पुरुष आणि महिलेत लढत केल्याची क्रीडाप्रेमींची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत गडबड! पुरुष बॉक्सरची महिलेशी झाली स्पर्धा, 46 सेकंदातच संपला सामना
| Updated on: Aug 01, 2024 | 10:16 PM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आता एका नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. या स्पर्धेत एका पुरुष बॉक्सरचा सामना महिलेशी केल्याचा आरोप केला जात आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत इटलीची बॉक्सर अँजेला कारिनी आणि अल्जीरियाची बॉक्सर इमान खेलीप यांच्यात सामना रंगला. पण हा सामना फक्त 46 सेंकदातच संपला. काही पंच सहन केल्यानंतर इटलीच्या बॉक्सरने हा सामना सोडून दिला. त्यानंतर अल्जीरियाची बॉक्सर इमान खेलीप हीला विजयी घोषित करण्यात आलं. हा सामना संपला असला तरी काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण 2023 वर्ल्ड चॅम्पियनशिप अंतिम सामन्यापूर्वी इमान खेलीपची लिंग चाचणी फेल ठरल्याने अपात्र घोषित करण्यात आलं होतं. असं असूनही महिलांच्या स्पर्धेत सहभागी केल्याने वादाला तोंड फुटलं आहे. इमान खेलीफच्या वैद्यकीय चाचणीत टेस्टोस्टेरोनचं प्रमाण अधिक असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याचबरोबर तिच्या डीएनए चाचणीत XY क्रोमोजोम्स मिळाले होते. XY क्रोमोजोम्स म्हणजेच मुलगा असल्याचं सिद्ध होतं. मुलींमध्ये क्रोमोजोम्स XX असतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने खेलीपवर बंदी घातली होती.

अल्जीरियाच्या बॉक्सरने या निर्णयाविरुद्ध अपील केली होती. मात्र त्यानंतर तिने अपील मागे घेतली.  अपील मागे घेतल्याने पुढे प्रश्न उरत नाही. म्हणजेच चाचणीत इमान खेलीप मुलगी नसल्याचं सिद्ध झालं आहे. इतक्या मोठ्या आरोपानंतरही खेलीपला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत संधी कशी मिळाली? असा प्रश्न आता क्रीडाप्रेमी विचारत आहेत. त्याचं कारण असं की ऑलिम्पिक खेळातील बॉक्सिंग सामन्यांसाठी आयबीए होत नाही. दुसरं याची संपूर्ण जबाबदारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीकडे आहे. या कमिटीने 1999 मध्ये या सर्व चाचण्या बंद केल्या होत्या. त्यामुळे ऑलिम्पिक खेळण्यासाठी आता महिलांना फक्त महिला असल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागतं. त्याचाच फायदा खेलीपने घेतला.

इटलीची बॉक्सर अँजेला कारिनीने सामना मधेच सोडून बरंच काही दाखवून दिलं आहे. त्यामुळे हा वाद पुढे आणखी चिघळणार यात शंका नाही. सामन्यानंतर इटलीची बॉक्सर खूप रडली. तिने सांगितलं की, ‘मी माझ्या आयुष्यात कधीच इतका जोरदार पंच सहन केलेला नाही. आता आयओसीला यावर निर्णय घेणं गरजेचं आहे.’