Olympics 2024 Highlights And Update: बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन सेमी फायनलमध्ये, मनु भाकर अंतिम फेरीत, सातवा दिवस अप्रतिम, 3 ऑगस्टचं वेळापत्रक जाणून घ्या

Paris Olympics 2024 2 August Updates Highlights In Marathi: भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सातव्या दिवशी (2 ऑगस्ट) अप्रतिम कामगिरी केली. बहुतांश खेळाडूंनी विजय मिळवत मेडल्सच्या दिशेने आगेकूच केली. जाणून घ्या दिवसभरात काय काय झालं?

Olympics 2024 Highlights And Update: बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन सेमी फायनलमध्ये, मनु भाकर अंतिम फेरीत, सातवा दिवस अप्रतिम, 3 ऑगस्टचं वेळापत्रक जाणून घ्या
lakshya sen and manu bhaker
| Updated on: Aug 03, 2024 | 2:53 AM

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील सातव्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारतीय खेळाडूंनी सातव्या दिवशी सांघिक आणि वैयक्तिक दोन्ही प्रकारात शानदार कामगिरी केली. महिला नेमबाज मनु भाकरने अंतिम फेरीत धडक दिली आहे. बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. हॉकी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. तर तिरंदाजी मिश्र दुहेरीत सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर कांस्य पदकाची संधी हुकली. एकूणच काही अपवाद वगळला तर भारतासाठी सातवा दिवस अविस्मरणीय ठरला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Aug 2024 02:35 AM (IST)

    भारतासाठी सातवा दिवस अविस्मरणीय, आता आठव्या दिवशी मनूच्या हॅटट्रिककडे लक्ष, 3 ऑगस्टचं वेळापत्रक

    भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील सातवा दिवसही ऐतिहासिक ठरला. भारताला. सातव्या दिवशी पदक मिळालं नाही, मात्र टीम इंडियाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. हॉकी टीम इंडियाने 72 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. भारताचा पूल बीमधील एकूण तिसरा विजय ठरला. लक्ष्य सेन याने बॅडमिंटन पुरुष एकेरी या प्रकारात उपांत्य फेरीत धडक दिली. लक्ष्य अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला. मनु भाकर हीने 25 मीटर पिस्तूल इवेंटमध्ये फायनलमध्ये धडक दिली. मनुचा शनिवारी 3 ऑगस्टला मेडलसाठीचा सामना होणार आहे. जाणून घ्या भारताच्या इतर सामन्यांचं वेळापत्रक.

    भारताचं शनिवार 3 ऑगस्टचं वेळापत्रक

  • 02 Aug 2024 10:36 PM (IST)

    लक्ष्य सेनची सेमी फायनलमध्ये धडक, तायवानच्या खेळाडूवर मात

    बॅडमिंटनपटू भारताच्या लक्ष्य सेन याने इतिहास रचला आहे. लक्ष्य सेन पुरुष एकेरी प्रकारात सेमी फायनलमध्ये पोहचला आहे. लक्ष्यने तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये तायवानच्या चाउ टीएन चेन याचा 21-12 ने पराभव केला. लक्ष्यने अशाप्रकारे हा सामना 2-1 अशा फरकाने जिंकला. लक्ष्य बॅडमिंटन पुरुष एकेरी प्रकारात सेमी फायनलमधअये पोहचणारा पहिला भारतीय ठरला आहे.

  • 02 Aug 2024 09:30 PM (IST)

    लक्ष्य सेनच्या सामन्याला सुरुवात, क्वार्टर फायनलमध्ये तायवानचं आव्हान

    बॅडमिंटन पुरुष एकेरीतील सामन्यात भारताच्या लक्ष्य सेन याच्यासमोर तायवानच्या चाऊ टीएन चेन याचं आव्हान आहे. हा क्वार्टर फायनल सामना आहे.

  • 02 Aug 2024 09:27 PM (IST)

    तिरंदाजीत टीम इंडियाची कांस्य पदकाची संधीही हुकली

    तिरंदाजीत टीम इंडियाची कांस्य पदकाची संधीही हुकली आहे. अमेरिकेच्या जोडीने तिरंदाजीत टीम इंडियाचा मिश्र दुहेरी प्रकारात 6-2 पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय जोडी अंकिता भकत आणि धीरज बोम्मादेवराचा प्रवास इथेच संपला आहे.

  • 02 Aug 2024 07:49 PM (IST)

    तिरंदाजीत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पराभूत

    तिरंदाजीत टीम इंडियाचा मिश्र दुहेरी प्रकारात अंकिता भकत आणि धीरज बोम्मादेवरा जोडीचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला आहे. कोरियाच्या जोडीने भारतावर 6-2 फरकाने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या पराभवासह रौप्य-सुवर्ण पदक जिंकण्याची संधी गमावली. आता टीम इंडियाची अंकिता-धीरज जोडी कांस्य पदकासाठी लढणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 54 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

    टीम इंडियाच्या जोडीला कांस्य पदकाची संधी

  • 02 Aug 2024 07:05 PM (IST)

    टीम इंडियाच्या तिरंदाज जोडीसमोर कोरियाचं आव्हान

    तिरंंदाजी मिश्र दुहेरीत टीम इंडियासमोर कोरियाचं आव्हान आहे. टीम इंडियाच्या अंकिता भकत-धीरज बोम्मादेवरा जोडीला पदकाची संधी आहे. या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.

  • 02 Aug 2024 06:21 PM (IST)

    हॉकी टीम इंडियाचा विजय

    ह़ॉकी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत कांगारुंवर 3-2 अशा फरकाने विजय मिळवला आहे.  टीम इंडियाने या विजयासह पूल बीमध्ये दुसरं स्थान पटकावलं आहे.

  • 02 Aug 2024 06:06 PM (IST)

    तिरंदाज अंकिता भकत-धीरज बोम्मादेवरा जोडीची सेमी फायनलमध्ये धडक

    भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तिरंदाजी मिश्र दुहेरी प्रकारात अंकिता भकत-धीरज बोम्मादेवरा जोडीने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाच्या या जोडीने स्पेनच्या जोडीचा 5 – 3 अशा फरकाने पराभव केला. आता थोड्याच वेळात सेमी फायनल सामना होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया मेडलपासून एक पाउल दूर आहे. त्याआधी अंकिता भकत-धीरज बोम्मादेवरा जोडीने इंडोनेशियाच्या जोडीला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.

    भारताची तिरंदाजांची जोडी सेमी फायनलमध्ये

  • 02 Aug 2024 05:56 PM (IST)

    तिसरं सत्रही भारताचंच

    हॉकी टीम इंडियाने सलग तिसरं सत्र आपल्या नावे केलं आहे. टीम इंडियाने तिसऱ्या सत्रानंतर 3-1 ने आघाडी कायम ठेवली आहे.

  • 02 Aug 2024 05:42 PM (IST)

    तिसऱ्या सत्रात तिसरा गोल, टीम इंडियाची आघाडी 2 ने मजबूत

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पुन्हा एकदा 2 गोलने आघाडी घेतली आहे. कॅप्टन हरमनप्रीत सिंह याने  या सामन्यात भारतासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिला गोल केला. टीम इंडियाने यासह 3-1 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.

  • 02 Aug 2024 05:28 PM (IST)

    दुसऱ्या सत्राचा खेळ संपला, टीम इंडिया आघाडीवर

    हॉकी टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यातील दुसऱ्या सत्राचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या सत्रातही आघाडी कायम ठेवली आहे. मात्र ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सत्रात गोल केल्याने ही आघाडी आता 2-1 अशी झाली आहे. हॉकी टीम इंडियाने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरचा सामना हा 1972 साली जिंकला होता. त्यामुळे आता भारताला 52 वर्षांनी सामना जिंकण्याची संधी आहे.

    सलग 2 सत्र भारताच्या नावे, आघाडी कायम

     

  • 02 Aug 2024 05:24 PM (IST)

    ऑस्ट्रेलियाकडून पहिला गोल, टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर

    ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्ध पहिला गोल केला आहे.  त्यानंतरही टीम इंडियाकडे 1 गोलची आघाडी आहे. टीम इंडिया 2-1 ने पुढे आहे.

  • 02 Aug 2024 05:08 PM (IST)

    मनु भाकरची फायनलमध्ये धडक, सामना केव्हा?

    महिला नेमबाज मनु भाकर हीने 25 मीटर रॅपिड पिस्तूल इवेंटच्या फायनलमध्ये पोहचली आहे. मनुने दुसऱ्या सीरिजमधये 98 तर पहिल्या सीरिजमध्ये 100 पॉइंट्स मिळवले. आता मनूला तिसरं पदक मिळवण्याची संधी आहे. अंतिम सामन्याला शनिवारी दुपारी 1 वाजेपासून सुरुवात होणार आहे.

    मनु भाकरची फायनलमध्ये एन्ट्री

  • 02 Aug 2024 05:05 PM (IST)

    टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर

    हॉकी टीम इंडियाने पहिलं सत्र आपल्या नावावर केलं आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 गोल करत ऑस्ट्रेलियावर कुरघोडी केली आहे. टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे.

  • 02 Aug 2024 05:00 PM (IST)

    हॉकी टीम इंडियाकडून पहिला गोल

    हॉकी टीम इंडियाने पहिला गोल केला आहे. यासह भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1-0 ने आघाडी घेतली आहे.

  • 02 Aug 2024 04:56 PM (IST)

    हॉकी टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान, सामना सुरु

    हॉकी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा पूल बीमधील हा शेवटचा सामना आहे.

  • 02 Aug 2024 03:29 PM (IST)

    नेमबाज अंकिता भकत-धीरज बोम्मादेवराचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

    तिरंदाज अंकिता भकत आणि धीरज बोम्मादेवराने धमाका केला आहे. दोघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या जोडीला पराभूत केलं.

  • 02 Aug 2024 03:21 PM (IST)

    रॅपिड फायर राउंडला साडे तीन वाजता सुरुवात

    25 मीटर पिस्तूल इवेंटला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मनु भाकरच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

  • 02 Aug 2024 03:19 PM (IST)

    मनु भाकर टॉप 3 मध्ये

    मनु भाकरने तिसऱ्या सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली आहे. मनु टॉप 3 मध्ये पोहचली आहे. पहिल्या 8 मध्ये असलेले खेळाडूच पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. त्याआधी मनु पहिल्या सीरिजनंतर 97 पॉइंट्ससह 12 व्या स्थानी होती. तर दुसऱ्या सीरिजनंतर मनु 98 गुणांसह सातव्या स्थानी होती. नेमबाज मनु 25 मीटर पिस्तूल इवेंटमध्ये मेडलसाठी खेळत आहे.

  • 02 Aug 2024 03:12 PM (IST)

    हॉकी टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान, सामना किती वाजता?

    हॉकी टीम इंडिया पूल बीमधील आपला पाचवा आणि शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाने आधीच क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र भारताला गेल्या चौथ्या सामन्यात बेल्जियम विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आता भारतीय चाहत्यांना हॉकी टीम इंडियाकडून विजयाची आशा असणार आहे. भारताने त्याआधी न्यूझीलंड आणि आयर्लंडवर विजय मिळवला. तर अर्जेंटिना विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला.

  • 02 Aug 2024 03:04 PM (IST)

    भारतासाठी सातवा दिवस निर्णायक

    भारतीय खेळाडूंसाठी आजचा 2 ऑगस्ट हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. भारताला आज 2 पदकांची संधी आहे. मनु भाकरकडून भारताला तिसऱ्या पदकाची आशा आहे. तर लक्ष्य सेन आणि इतर खेळाडूंच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे.