
प्रो रेसलिंग लीग स्पर्धेचा थरार पुन्हा एकदा कुस्तीप्रेमींना अनुभवायला मिळत आहे. एका विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कुस्तीपटू प्रो रेसलिंग लीग स्पर्धेच्या रिंगणात उतरले आहे. प्रो रेसलिंग लीग ही भारतातील एक प्रमुख व्यावसायिक कुस्ती लीग आहे. ही लीग भारतातील अव्वल कुस्तीपटूंना आणि आघाडीच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना एका व्यावसायिक हंगाम-आधारित स्वरूपात एकत्र आणते. देशाच्या पारंपरिक आखाडा प्रणालीतून पुढे येणाऱ्या कुस्तीपटूंना सातत्यपूर्ण स्पर्धा, राष्ट्रीय ओळख आणि शाश्वत करिअरचे मार्ग प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
प्रो रेसलिंग लीग 2026 स्पर्धेत दिल्ली दंगल वॉरियर्स, हरियाणा थंडर्स, टायगर्स ऑफ मुंबई दंगल, महाराष्ट्र केसरी, पंजाब रॉयल्स आणि यूपी डोमिनेटर्स हे सहा संघ उतरले आहेत. एकूण 15 साखळी फेरीचे सामने खेळले जात आहेत. यात कुस्ती संघ राउंड रॉबिन पद्धतीने एकमेकांशी दोन हात करत आहेत. गुणतालिकेत अव्वल चार 30 आणि 31 जानेवारीला उपांत्य फेरीचे सामने खेळतील. तर 1 जानेवारीला अंतिम फेरीचे सामने होणार आहेत.
नोएडा इनडोअर स्टेडियम, उत्तर प्रदेश येथे होणार आहे आणि त्याचे राष्ट्रीय स्तरावर सोनी लिव्ह आणि सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जात आहे.
महाराष्ट्र केसरी संघाने सध्या 4 सामने खेळले असून तीन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव झाला आहे. सध्या पारड्यात 6 गुण असून पहिल्या स्थानवर आहे. यूपी डोमिनेटर्स दुसऱ्या स्थानावर असून 4 पैकी 2 सामन्यात विजय आणि 2 सामन्यात पराभव झाला आहे. यूपी डोमिनेटर्स पारड्यात 4 गुण आहेत. हरयाणा थंडर्सने 3 सामने खेळले असून 2 सामने जिंकलेत. तर एका सामन्यात पराभव झाला आहे. 4 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पंजाब रॉयल्सची स्थिती हरयाणासारखीच असून पारड्यात 4 गुण आहेत. दिल्ली दंगल वॉरियर्सने 3 पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्लीच्या पारड्यात 2 गुण आहेत. टायगर्स ऑफ मुंबई दंगलची स्थिती नाजूक आहे. आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात पराभव झाला असून पारड्यात काही गुण नाहीत.