क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी टीव्ही 9 नेटवर्कच्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेस मोहिमेचं केलं कौतुक

टीव्ही 9 नेटवर्कच्या "इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस" मोहिमेचा देशव्यापी फुटबॉल प्रतिभा शोध मोहिमेचा समारोप झाला. 28 प्रतिभावंत खेळाडूंची ऑस्ट्रिया आणि जर्मनीमध्ये उच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि खेळाडूंना 2036 च्या ऑलिंपिक आणि फिफा विश्वचषकासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित केले.

क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी टीव्ही 9 नेटवर्कच्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेस मोहिमेचं केलं कौतुक
| Updated on: Apr 07, 2025 | 8:28 PM

क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी टीव्ही 9 नेटवर्कने आयोजित केलेल्या ऐतिहासिक इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेचे कौतुक केले. या ऐतिहासिक उपक्रमात देशभरातील मोठ्या संख्येने प्रतिभावंत खेळाडूंनी सहभाग घेतला. या मेगा-इव्हेंटच्या माध्यमातून सहभागी झालेल्या भारतातील आघाडीच्या युवा फुटबॉल खेळाडूंचा शोध घेण्यात आला. युरोपच्या ऐतिहासिक दौऱ्यानंतर देशात परतलेल्या खेळाडूंना केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी प्रोत्साहन दिले. मनसुख मांडविया यांनी युवा विजेत्यांना कठोर परिश्रम करण्यास आणि 2036 च्या ऑलिंपिकसाठी मोठे ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच फिफा विश्वचषकात देशाचा ठसा उमटवण्यास मदत करण्याचे आवाहन केले.

क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांचे कौतुकाचे शब्द

क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी भारतीय लष्करातील जवानांचे उदाहरण देऊन तरुणांना प्रेरित केले. देशाचे प्रतिनिधित्व करण्याची प्रतिष्ठित संधी आहे, असं सांगितलं. इतकंच काय तर मुलांशी संवाद साधला आणि त्यांना युरोपमधील त्यांच्या अनुभवांबद्दल विचारले आणि भारताच्या फुटबॉल भविष्यावर विश्वास व्यक्त केला. तब्बल 50 हजार नोंदणींमधून 10 हजार सहभागी खेळाडूंची प्रादेशिक चाचण्यांसाठी निवड करण्यात आली. परंतु ऑस्ट्रिया आणि जर्मनीमधील विशेष प्रशिक्षणासाठी फक्त 28 प्रतिभावान खेळाडूंची निवड करण्यात आली होती.

12-14 आणि 15-17 वयोगटातील खेळाडूंसाठी जगातील सर्वात मोठा फुटबॉल प्रतिभा शोध उपक्रम राबवविला. इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेची सुरुवात एप्रिल 2024 मध्ये झाली आणि २८ फुटबॉलपटूंनी त्यांचे फुटबॉल स्वप्न साकार केले.28 मार्च रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (WITT) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज 9 “इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस” उपक्रमाला आशीर्वाद दिले होते. या युवा खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ऐतिहासिक निरोप मिळाला होता. ऑस्ट्रियातील ग्मुंडेन येथे युरोपियन प्रशिक्षकांसोबतच्या तीव्र आणि कठोर प्रशिक्षण सत्रांमध्ये या तरुण फुटबॉलपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच कौशल्य आणि दृढनिश्चय दाखवला.

भारत ते युरोप: तरुण फुटबॉलपटूंचं स्वप्न

कठीण हवामान असूनही तरुण फुटबॉलपटूंनी लक्ष केंद्रित केले आणि त्यांच्या सराव सत्रांचा पुरेपूर फायदा घेतला. दोन दिवसांच्या सखोल सरावानंतर त्यांची सर्वात मोठी परीक्षा ग्मुंडेन फुटबॉल अकादमीविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात झाली. भारतीय मुलांनी अंडर-15 गटात आक्रमक कौशल्य आणि सांघिक कामगिरीचे दमदार प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना 7-0 असे पराभूत करून आश्चर्यकारक कामगिरी केली. दरम्यान, मुलींनी उत्साही प्रदर्शन करूनही अंडर 13 गटात त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला.

या तरुण खेळाडूंनी जर्मन क्लब व्हीएफबी स्टुटगार्टसोबत मनापासून खेळ केला. हा क्लब टीव्ही9 नेटवर्कच्या उपक्रमाचा युवा विकास भागीदार आहे. तसेच भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे बारकाईने निरीक्षण केले. “स्पेशल 28” चे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर जर्मनीमध्ये स्टुटगार्टच्या 12 वर्षांखालील संघासोबत दोन दिवसांच्या प्रशिक्षण सत्रासाठी चार खेळाडूंची निवड करण्यात आली. भारतीय खेळाडूंनी सरावात घाम गाळला. वेगवान पासिंग, अचूकता आणि दबावाखाली केलेली पासिंग कौतुकास्पद होती.

दरम्यान, ऑस्ट्रियामध्ये उर्वरित टायगर अँड टायग्रेसचे ग्मुंडेन कामगिरी चाचणी प्रयोगशाळेत डेटा-आधारित निरीक्षण नोंदवण्यात आले. यात स्प्रिंट वेग, संतुलन, ताकद आणि रिकव्हरी यांचा समावेश होता. भारत ते ग्मुंडेन ते जर्मनी पर्यंत टायगर अँड टायग्रेसने असाधारण प्रवासाने एक अद्वितीय बेंचमार्क स्थापित केला आहे.