LIVE सामन्यात गोळीबार, खेळाडूंसह प्रेक्षकांची तारांबळ, एका महिला दर्शकासह तिघेजण जखमी, पाहा VIDEO

गोळीबार होताच प्रेक्षकांनी तुंडुंब भरलेल्या स्टेडियममधील प्रेक्षक घाबरले. आधी अधिकाऱ्यांनी त्यांना मैदानातच थांबायला सांगितले. पण नंतर दुसऱ्या रस्त्याने प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आले.

LIVE सामन्यात गोळीबार, खेळाडूंसह प्रेक्षकांची तारांबळ, एका महिला दर्शकासह तिघेजण जखमी, पाहा VIDEO
अचानक गोळीबार झाल्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली

प्रेक्षकांनी तुंडुब भरलेल्या मैदानात बेसबॉलचा (Baseball Match) सामना सुरु होता. दोन्ही संघ अप्रतिम खेळ दाखवत एकमेंकाना पराभूत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. पण अचानक गोळीबाराचा (Gun Firing in Live Match) आवाज आला आणि बघता बघता सर्वत्र हाहाकर माजला. खेळाडूंसह प्रेक्षकांची दाणादाण उडाली. अमेरिकेत सुरु असलेल्या वॉशिंग्टन नॅशनल्सच्या (Washington nationals) सामन्यात हा गोळीबार झाला ज्याने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे.

एक बेसबॉलचा सामना 9 इनिंगचा असतो. पण अमेरिकेत शनिवारी रात्री सुरु असलेला अटीतटीचा सामना आठव्या इनिंगमध्येच असताना अचानक मैदानाबाहेर गोळीबार झाला आणि बघता बघता सर्वांचीच तारांबळ उडाली. गोळ्यांच्या धाड-धाड आवाजाने सर्वंचजण घाबरले. खेळाडू मैदानातून पळू लागले तर प्रेक्षकांची हालतही खराब झाली.

घाबरलेल्या प्रेक्षकांना दुसऱ्या रस्त्याने बाहेर काढलं

पोलिसांनी घटनेनंतर पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीत सांगितले की ही संपूर्ण घटना मैदानाबाहेर दोन गाड्यांवरुन आलेल्या व्यक्तींमध्ये झालेल्या गोळीबाराची आहे. पण मैदानापासून जवळच गोळीबार झाल्याने मैदानातील प्रेक्षक मोठ्या प्रमाणात घाबरले. सर्वात आधी सुरक्षा रक्षकांनी प्रेक्षकांना मैदानातच सुरक्षितठिकाणी थांबायला सांगितले. पण नंतर दोन रस्तायंनी  सेंटरफील्ड गेट आणि राइटफील्ड गेटने प्रेक्षकांना बाहेर काढलं.

1 महिला दर्शकासह 3 जण जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्यात गोळीबार झाला त्या दोघांसह एक महिला प्रेक्षकही जखमी झाली आहे. संबधित महिला काही कामानिमित्त मैदानाबाहेर गेली असतानाच ही घटना घडली. सुदैवाने महिलेची प्रकृती सध्या ठिक आहे. तर इतर दोघा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेत गोळीबारात सामिल इतरांचा तापस सुरु आहे. संबधित सामना पुन्हा रविवारी खेळवला जाऊ शकतो.

हे ही वाचा

Tokyo Olympics : ऑलम्पिकमध्ये कोरोना धोका वाढताच, दोन आणखी खेळाडू कोरोनाची बाधा

(Sudden Gun Shooting outside the Stadium during Washington nationals Game at america 4 people were Injured)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI