कुस्तीपटू विनेश फोगाट पुन्हा उतरणार मॅटवर, सर्वोच्च न्यायायलचा कुस्ती महासंघाला दणका; पण…

कुस्तीपटू विनेश फोगाटला आशियाई खेळांच्या निवड चाचणीत भाग घेण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्याचबरोबर ही सुनावणी करत असताना हायकोर्टालाही समज दिली आहे. इतकंच काय तर कुस्ती महासंघाच्या याचिकेवर विनेशकडून उत्तर मागितलं आहे.

कुस्तीपटू विनेश फोगाट पुन्हा उतरणार मॅटवर, सर्वोच्च न्यायायलचा कुस्ती महासंघाला दणका; पण...
कुस्तीपटू विनेश फोगाट पुन्हा उतरणार मॅटवर, सर्वोच्च न्यायायलचा कुस्ती महासंघाला दणका; हायकोर्टाला समज
Image Credit source: PTI
| Updated on: May 29, 2026 | 3:22 PM

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि वाद हे गेल्या काही दिवसात समीकरण झालं आहे. ठराविक कालावधीनंतर काही ना काही वाद तिच्याशी निगडीत समोर येत असतात. आशियाई खेळ 2026 निवड चाचण्यांचे वेळापत्रक आणि नियमांसंदर्भात भारतीय कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटूंमध्ये असाच एक वाद सुरू होता. विनेश फोगाटने या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं. पण आता विनेश फोगाटला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2026 आशियाई खेळातील निवड चाचणीत भाग घेण्याची परवानगी दिली आहे. ही चाचणी प्रक्रिया 30 आणि 31 मे रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की, विनेश फोगाट प्रकरण सामान्य खेळाडूंपेक्षा वेगळे आहे, न्यायालयाने सुनावणीत म्हंटलं की, “जर ही दुसरी कोणतीही खेळाडू असती, तर प्रकरण वेगळे असते. त्यांनी देशाला गौरव मिळवून दिला आहे.”

काय आहे प्रकरण?

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं होतं. भारतीय कुस्ती महासंघाने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. उच्च न्यायालयात विनेश फोगाटने याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल देत चाचणी प्रक्रियेत भागा घेण्याची परवानगी दिली होती. मात्र या निर्णयाविरुद्ध कुस्ती महासंघाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे खेळाच्या नियोजित स्पर्धा आणि निवड प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम झाल्याचं त्यांनी याचिकेत म्हंटलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयाने विनेशची पात्रता ओळखून तिला आशियाई खेळांच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली. दुसरीकडे, क्रीडा धोरण आणि वेळापत्रकावर महासंघाचे अधिकारक्षेत्र मान्य करून उच्च न्यायालयाला समजही दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयच्या सुनावणीत काय झालं?

न्यायमूर्ती नरसिंह म्हणाले, “तुम्ही एक उत्कृष्ट कुस्तीपटू आहात, तुम्ही देशाला अभिमान वाटेल असे काम केले आहे, पण देश प्रथम येतो. उच्च न्यायालय संपूर्ण वेळापत्रकात व्यत्यय आणू शकत नाही.” न्यायमूर्ती नरसिंह यांनी कठोर शब्दात पुढे सांगितलं की , “हे वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश नाहीत. हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळ आहेत. न्यायालयांना अशा प्रकारे हस्तक्षेप करून संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत करणे शक्य नाही.” सर्वोच्च न्यायालयाने आता विनेशला दिलासा देत चाचण्यांमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली आहे. असं असलं तरी कुस्ती महासंघाच्या याचिकेवर तिचे उत्तरही मागवले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us